मोतीपैंजण (ऊरलेल्या पोळ्या व भाताची पोटभरी न्याहारी)(leftover recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

नावाने चकीत झाले ना ,खरंच किती गम्मत आहे. प्रत्येक मराठी घरात हा पदार्थ आवर्जून केल्या जातो पण गावागणिक या पाककृतीला वेगवेगळी नावे आहेत ,कोणी फोडणीचा भात पोळ्या म्हणतात ,कोणी मनोरमा म्हणतात ,तुम्हाला माहिती असलेली नावे सुद्धा सांगा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

दहा मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. 5पोळ्या
  2. 3 कपमोकळा भात
  3. 2हिरव्या मिरच्या चिरलेल्या
  4. 10कढीपत्त्याची पाने
  5. 2 टेबल स्पूनशेंगदाणे
  6. 1 टीस्पूनमोहरी जिरे
  7. 1 टीस्पून बडीशेप
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 1 पिंचहिंग
  10. 1/2 टीस्पूनहळद
  11. 1/2 टिस्पूनतिखट
  12. 2 टिस्पून लिंबाचा रस
  13. 1 टिस्पून साखर
  14. 2 टेबलस्पूनतेल
  15. 1 टी स्पूनचिरलेली कोथिंबीर

कुकिंग सूचना

दहा मिनिट
  1. 1

    प्रथम पोळ्या कुस्करून घ्याव्या,मोकळा भात व पोळ्यांचा कुस्करा एकत्र करावा.आता कढईमध्ये तेल घेऊन गरम झाल्यावर जिरे, मोहरी,बडीशेप इत्यादी ची फोडणी करावी.त्यानंतर शेंगदाणे,हिरवी मिरची, कढीपत्ता इत्यादी घातल्यानंतर हिंग, हळद, तिखट, मीठ घालावे.

  2. 2

    यानंतर एकत्र केलेला कुस्करा व भात घालून हलवत रहावे. झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. दोन ते तीन मिनिटांनी यामध्ये लिंबाचा रस व साखर ॲड करावी, व पुन्हा एक मिनिटासाठी झाकण ठेवावे.आता गॅस बंद करून गरमागरम सर्व्ह करावे. सर्व्ह करताना प्लेटमध्ये कोथिंबीर घालावी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes