वॉलडॉर्फ सॅलड (Waldorf Salad recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week13

न्यूयॉर्कच्या वॉलडॉर्फ अस्टॉरीया हॉटेल मध्ये १८९६ मध्ये वॉलडॉर्फ सॅलड प्रथम बनवलं गेलं. हॉटेलच्या नावावरून ह्या सॅलडला वॉलडॉर्फ सॅलड असं नाव दिलं गेलं. त्यावेळच्या मूळ रेसिपीमध्ये फक्त सफरचंद, सेलरी आणि मेयोनीज घातलं होतं. त्यानंतर १९२८ मध्ये रेक्टर रेसिपी कूक बूक मध्ये लिहिलेल्या रेसिपीत नट्स घालून रेसिपी लिहिली गेली. तेव्हापासून वॉलडॉर्फ सॅलड मध्ये मुख्यतः सफरचंद, अक्रोड, सेलरी आणि मेयोनीज घातलं जातं. हल्ली ह्या सॅलड चे वेगवेगळे प्रकार केले जातात ज्यात फळं आणि सुका मेवा घालतात. मी मेयोनीज ऐवजी ग्रीक योगर्ट (चक्का) घालते. खूप चविष्ट आणि पौष्टिक असतं हे सॅलड.   

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

300 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. मध्यम आकाराचे सफरचंद मोठे तुकडे करून
  2. १ कपकलिंगडाचे मोठे तुकडे
  3. १ कपटरबूज मोठे तुकडे
  4. 1/2 कपअननस मोठे तुकडे
  5. 1/2 लिंबाची साल
  6. 2 टेबलस्पूनमध
  7. 1/2 टीस्पूनलिंबाचा रस
  8. 1/2 टीस्पूनदालचिनी पावडर
  9. 2-3 चिमूटजायफळ पावडर
  10. 3 कपदही
  11. १५-२०बेदाणे
  12. १५-२०बदाम तुकडे करून
  13. चवीनुसार मीठ
  14. लेट्युसची पाने सर्व्हिन्ग साठी

कुकिंग सूचना

300 मि
  1. 1

    दही एका पातळ कापडात बांधून ३-४ तास टांगून ठेवा. म्हणजे त्याचा चक्का बनेल.

  2. 2

    ह्या चक्क्यात लिंबाची साल बारीक किसणीने किसून घाला. मध, दालचिनी पावडर, जायफळ पावडर आणि मीठ घालून एकत्र करा.

  3. 3

    ताजी कापलेली फळं, बेदाणे आणि बदामाचे काप घालून एकत्र करा आणि फ्रीज मध्ये गार ठेवून करा. मिश्रण फार घट्ट झालं असेल तर थोडं दही घालून एकजीव करा. मिश्रण क्रिम सारखं असायला हवं. हे सॅलड गार सर्व्ह करायचे असतं.

  4. 4

    सर्व्ह करताना लेट्युस ची पाने प्लेट मध्ये पसरवा आणि त्यावर हे सॅलड घालून सर्व्ह करा थंडगार चविष्ट वॉलडॉर्फ सॅलड.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

Similar Recipes