केळफुलाचे कटलेट (kelfulache cutlet recipe in marathi)

Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
पुणे

#कटलेट #सप्टेंबर
केळफूलात कोलेस्ट्रेरॉल,साखर यांचे प्रमाण अत्यंत कमी असते. मात्र कॅल्शियम, चांगल्या प्रतीची प्रथिनं , मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपर यांचा नैसर्गिकरित्या मुबलक साठा केळफूलात आढळतो. यामुळे हृद्यरोगी आणि मधूमेहींना त्याच्या सेवनाचा फायदा होण्यास मदत होते.

केळफुलाचे कटलेट (kelfulache cutlet recipe in marathi)

#कटलेट #सप्टेंबर
केळफूलात कोलेस्ट्रेरॉल,साखर यांचे प्रमाण अत्यंत कमी असते. मात्र कॅल्शियम, चांगल्या प्रतीची प्रथिनं , मॅग्नेशियम, आयर्न आणि कॉपर यांचा नैसर्गिकरित्या मुबलक साठा केळफूलात आढळतो. यामुळे हृद्यरोगी आणि मधूमेहींना त्याच्या सेवनाचा फायदा होण्यास मदत होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबारीक चिरलेले ताजे केळ फुल
  2. 1/3 कपबारीक चिरलेला कांदा
  3. 2मीडियम साईज उकडलेले बटाटे
  4. 1/2 कपसोया चंक
  5. 1 चमचाकिसलेला लसूण
  6. 1 चमचाकिसलेले आलेचमचा किसलेले आलं
  7. 3-4बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या
  8. 1चमच्या काळेमिरे पूड
  9. 1/4 कपमैदा
  10. चवीनुसार मीठ
  11. शालो फ्राय करण्यासाठी तेल
  12. 1 कपमिक्सर मधून जाडसर फिरवलेले ओट्स

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सर्व साहित्य घ्या.

  2. 2

    सर्वप्रथम गरम पाण्यात सोया चंक दहा मिनिट भिजत घालून ठेवा.

  3. 3

    आता केळ फुल एका पॅनमध्ये ¼ चमचा मीठ टाकून केळ फुलातील ज्यूस आटे पर्यंत भाजून घ्या.

  4. 4

    सोया चंक गरम पाण्यातून काढून पाच ते दहा मिनिटं थंड पाण्यात भिजू द्या, नंतर त्यातील पाणी निथळून सोया चंक बारीक बारीक कट करून घ्या. सोबतच उकडलेले बटाटे सोलून स्मॅश किंवा ग्रेट करून घ्या.

  5. 5

    एका पॅनमध्ये दीड चमचा तेल गरम करून त्यात कांदा टाकून दोन मिनिटे परतून घ्या नंतर त्यात बारीक कापलेली हिरवी मिरची, किसलेले आलं आणि लसुन टाकून आणखी दोन मिनिटे परतून घ्या.

  6. 6

    आता त्यात मिरेपूड, बारीक कापलेले सोया चंक आणि मिठ टाकून एक मिनिट शिजवून घ्या.

  7. 7

    केळ फुल आणि बटाटे टाकून चांगले मिक्स करून घ्या व अजून एक दोन मिनिट चांगले परतून घ्या, परतून झाल्यावर हे मिश्रण थंड होण्यासाठी ठेवा.

  8. 8

    आता आपण कोटिंग साठी बॅटर बनवून घेऊ, त्यासाठी मैदा, अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा काळे मिरे पूड आणि पाणी टाकून बॅटर बनवून घ्या.

  9. 9

    थंड झाल्यावर मिश्रणाला कटलेट चा आकार द्या. नंतर तयार केलेल्या बॅटर मध्ये टाकून दोन्ही बाजूंनी व्यवस्थित कोट करा मग त्याला बारीक केलेल्या ओट्स नि सर्व बाजूंनी कोटिंग करून घ्या,

  10. 10

    पॅनमध्ये तेल गरम करून कटलेट्स ला दोन्ही बाजूंनी क्रिस्पी होईपर्यंत शालो फ्राय करून घ्या.

  11. 11

    आपले केळफुल कटलेट तयार आहेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Amit Chaudhari
Amit Chaudhari @Amit_1234
रोजी
पुणे

Similar Recipes