अळूवडी (aluvadi recipe in marathi)

Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542

#रेसिपीबुक #week14
अळूवडी हा बहुतेक सगळ्या मराठी लोकांचा आवडता पदार्थ आहे. वडीच्या अळूच्या पानांना पीठ सारवून उंडे वळून वाफवून घेतात. वाफवलेले उंड्यांच्या वड्या कापून तळतात किंवा तव्यावर तेल घालून भाजतात. ह्या वड्यांचे बारीक तुकडे करून खमंग फोडणीला टाकले आणि नारळ, कोथिंबीर घातली की छान चविष्ट भाजी सुद्धा होते. अळुवडीचं पीठ वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. ही ब्राह्मणी पद्धतीची अळूवडी - भाजणी, चिंच, गूळ आणि गोडा मसाला घालून फारच चविष्ट लागते.

अळूवडी (aluvadi recipe in marathi)

#रेसिपीबुक #week14
अळूवडी हा बहुतेक सगळ्या मराठी लोकांचा आवडता पदार्थ आहे. वडीच्या अळूच्या पानांना पीठ सारवून उंडे वळून वाफवून घेतात. वाफवलेले उंड्यांच्या वड्या कापून तळतात किंवा तव्यावर तेल घालून भाजतात. ह्या वड्यांचे बारीक तुकडे करून खमंग फोडणीला टाकले आणि नारळ, कोथिंबीर घातली की छान चविष्ट भाजी सुद्धा होते. अळुवडीचं पीठ वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. ही ब्राह्मणी पद्धतीची अळूवडी - भाजणी, चिंच, गूळ आणि गोडा मसाला घालून फारच चविष्ट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50 मि
5 सर्व्हिंग्ज
  1. १२अळूची पानं मध्यम आकाराची
  2. 1 कपथालीपीठ भाजणी
  3. 2 टेबलस्पूनबेसन
  4. 1 टेबलस्पूनतांदुळाचं पीठ
  5. 1/4 कपचिंचेचा कोळ
  6. 2 टेबलस्पूनचिरलेला गूळ
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. चवीनुसार मीठ
  9. 1 टीस्पूनलाल तिखट
  10. 1 टीस्पूनगोडा मसाला
  11. 3 टेबलस्पूनतेल तळायला / तव्यावर भाजायला

कुकिंग सूचना

50 मि
  1. 1

    एका वाडग्यात चिंचेचा कोळ, गूळ, थालीपीठाची भाजणी, बेसन, तांदुळाचं पीठ, लाल तिखट, गोडा मसाला आणि मीठ घालून मिश्रण एकजीव करा. थोडं पाणी घालून भज्यांच्या पिठापेक्षा दाट पीठ भिजवा.

  2. 2

    अळूच्या पानांचे देठ काढून टाका आणि पानं स्वच्छ धुवून घ्या. पानाची शीर फार जाड असेल तर वरचा भाग सुरीने कापून टाका.पानं आकारानुसार मांडून घ्या -मोठं पान सगळ्यात खाली आणि नंतर आकाराप्रमाणे लहान पानं. एका उंड्यासाठी ३-४ पानं घ्या.

  3. 3

    प्रत्येक उंड्यासाठी सगळ्यात मोठं पान उलटं ठेवून त्यावर पीठ सारवा. त्या पानापेक्षा लहान पान त्यावर उलटं ठेवून परत पीठ सारवा. नंतर तिसरं, चौथं पान ठेवून पीठ सारवा.

  4. 4

    पानाच्या तळाचा भाग दुमडून घ्या. पानाच्या दोन्ही बाजूचे भाग दुमडून घ्या. पानाची घट्ट गुंडाळी करा. शेवटी थोडं पीठ लावून वळा म्हणजे गुंडाळी सुटणार नाही. हा उंडा तयार झाला.

  5. 5

    असे सगळे उंडे तयार करून घ्या.

  6. 6

    इडली पात्रात / मोठ्या पातेल्यात पाणी गरम करायला ठेवा. पाणी उकळलं की तयार उंडे जाळीच्या ताटलीत किंवा चाळणीत ठेवून इडली पात्रात / पातेल्यात ठेवा. झाकण लावून मध्यम आचेवर २०-२२ मिनिटं वाफवून घ्या.

  7. 7

    उंड्यात सुरी घालून नीट शिजलाय का बघा. उंडे गार झाले कि अर्धा सेमी चे तुकडे करा. आणि गरम तेलात तळून घ्या किंवा तव्यावर तेल घालून भाजून घ्या.गरमगरम चविष्ट अळूवडीचा आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sudha Kunkalienkar
Sudha Kunkalienkar @cook_19609542
रोजी

Similar Recipes