ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi)

इतिहास ही केवळ युद्धाची नाही तर विचार, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीच्या प्रवासाची गोष्ट असते. आमचा वाडवळ समाज हे संस्कृतीच्या प्रवासाचे उत्तम उदाहरण आहे. इ. स. ११३८ मध्ये प्रताप बिंब राजाने आणि नंतर सुमारे दिडशे वर्षांनी देवगिरीचा युवराज बिंबदेव यादव याने हा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेतला. पश्चिम किनाऱ्याला उत्तर कोकणात आमची संस्कृती (खाद्यसंस्कृतीसह) वसलेली आहे. या दोन्ही राजांनी आपल्या सोबत आणलेली २७ कुळे सोमवंशी क्षत्रिय होती, जी आपली खाद्यसंस्कृती सोबत घेऊन आली होती. आम्ही आपली मुळ संस्कृती सांभाळून पुढे शेती-वाडी करुन इतर खाद्यसंस्कृतींना आम्ही रसद पुरवू लागलो, 'वाडवळ' (वाडी करणारे) ही आमची नवी ओळख बनली. केवळ एका राजापासून दुसऱ्या राजापर्यंतचा नव्हे, हा एका खाद्यसंस्कृतीचा प्रवास आहे.
काही भाषातज्ञांच्या मते, वाडवळी भाषेतील 'अटे-तटे' (इथे-तिथे) हे शब्दोच्चार या प्रवासात मारवाडी भाषेतून आले आहेत. म्हणूनच 'पश्चिम भारत' या थीमच्या निमित्ताने मागे वळून पाहत एक खास राजस्थानी रेसिपी 'ओल्या हळदीची भाजी' बनविली आहे.
बहुगुणी हळद हे आपल्याला लाभलेले नैसर्गिक वरदान आहे. तीचे गुणधर्म सर्वश्रृत आहेत. म्हणून आपण थेट रेसिपी कडे येऊ. गुलाबी थंडीच्या मोसमात ही उष्ण प्रकृतीची भाजी केली जाते. त्यात वापरले जाणारे जिन्नसांत चव, गुणधर्म यासोबत रंग देखील बॅलेंस केले आहेत. ही झटपट होणारी भाजी नाही, आपल्याला तिला वेळ द्यावा लागतो. विविध जिन्नस जमवून एकएका जिन्नसाची योग्य क्रमाने सिद्धता करावी लागते. हळदीचा सुगंध, हाताला चढणारा रंग, आणि पहिल्या घासात मनाचा ठाव घेणारी राजसी चव! आहाहा!!! आणि हे अनुभवायचे तर एकदा ही भाजी नक्की करून पहा...
ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi)
इतिहास ही केवळ युद्धाची नाही तर विचार, संस्कृती आणि खाद्यसंस्कृतीच्या प्रवासाची गोष्ट असते. आमचा वाडवळ समाज हे संस्कृतीच्या प्रवासाचे उत्तम उदाहरण आहे. इ. स. ११३८ मध्ये प्रताप बिंब राजाने आणि नंतर सुमारे दिडशे वर्षांनी देवगिरीचा युवराज बिंबदेव यादव याने हा प्रदेश आपल्या अधिपत्याखाली घेतला. पश्चिम किनाऱ्याला उत्तर कोकणात आमची संस्कृती (खाद्यसंस्कृतीसह) वसलेली आहे. या दोन्ही राजांनी आपल्या सोबत आणलेली २७ कुळे सोमवंशी क्षत्रिय होती, जी आपली खाद्यसंस्कृती सोबत घेऊन आली होती. आम्ही आपली मुळ संस्कृती सांभाळून पुढे शेती-वाडी करुन इतर खाद्यसंस्कृतींना आम्ही रसद पुरवू लागलो, 'वाडवळ' (वाडी करणारे) ही आमची नवी ओळख बनली. केवळ एका राजापासून दुसऱ्या राजापर्यंतचा नव्हे, हा एका खाद्यसंस्कृतीचा प्रवास आहे.
काही भाषातज्ञांच्या मते, वाडवळी भाषेतील 'अटे-तटे' (इथे-तिथे) हे शब्दोच्चार या प्रवासात मारवाडी भाषेतून आले आहेत. म्हणूनच 'पश्चिम भारत' या थीमच्या निमित्ताने मागे वळून पाहत एक खास राजस्थानी रेसिपी 'ओल्या हळदीची भाजी' बनविली आहे.
बहुगुणी हळद हे आपल्याला लाभलेले नैसर्गिक वरदान आहे. तीचे गुणधर्म सर्वश्रृत आहेत. म्हणून आपण थेट रेसिपी कडे येऊ. गुलाबी थंडीच्या मोसमात ही उष्ण प्रकृतीची भाजी केली जाते. त्यात वापरले जाणारे जिन्नसांत चव, गुणधर्म यासोबत रंग देखील बॅलेंस केले आहेत. ही झटपट होणारी भाजी नाही, आपल्याला तिला वेळ द्यावा लागतो. विविध जिन्नस जमवून एकएका जिन्नसाची योग्य क्रमाने सिद्धता करावी लागते. हळदीचा सुगंध, हाताला चढणारा रंग, आणि पहिल्या घासात मनाचा ठाव घेणारी राजसी चव! आहाहा!!! आणि हे अनुभवायचे तर एकदा ही भाजी नक्की करून पहा...
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम चित्रात दाखविल्याप्रमाणे सगळे साहित्य घ्यावे. आता टॉमेटो, कांदे, मिरची व आले यांचे एकदम बारीक मिश्रण करून घ्यावे. (हे वाटताना अजिबात पाणी घालू नये). आणि सोललेला दीड लसूण पाकळ्या व्यवस्थित ठेचून घ्याव्यात.
- 2
आता ओली हळद नीट सोलून किसून घ्यावी. नंतर gas वर कढईमध्ये तूप घ्यावे. (सगळे तूप घालू नये, थोडे ठेवावे. आपण ते नंतर घालणार आहोत).
तूप गरम झाल्यावर त्यात जिरे व सगळा खडा मसाला घालून छान चुरचुरू द्यावा.
आता त्यात किसून घेतलेली हळद घालून घ्यावी. हळद त्या तुपात व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. - 3
५-७ मिनिटे चांगली परतवून घ्यावी. आता त्यात ठेचलेला लसूण घालून परत ७-८ मिनिटे हळद व लसूण चांगले तूप सुटेपर्यंत परतवून घ्यावे. छानपैकी परतवून घेतलेल्या हळदीत तयार केलेले टॉमेटो, कांदे, मिरची व आले यांचे तयार मिश्रण घालून परत ५ मिनिटे मिक्स करून घ्यावे. आता त्यात २ अक्खे लसूण घालून २ मिनिटे ढवळून शिजवून घ्यावे. (हा घातलेला अक्खा लसूण शिजल्यावर अतिशय अप्रतिम लागतो. त्यात ओल्या हळदीची चव जि उतरते त्याला तोडच नाही). आता त्यात आधी शिल्लक ठेवलेले तूप घालावे.
- 4
आता त्यात दही घालून व्यवस्थित एकत्रित करावे व २ मिनिटे चांगले शिजू द्यावे.(दही घातल्यावर भाजी सतत ढवळत राहावी जेणेकरून दही फाटणार नाही). नंतर त्यात ब्लांच केलेले मटार घालावेत. आणि एक उकळी काढून घ्यावी. ओल्या हळदीची भाजी तय्यार!!!
- 5
पारंपारिक पद्धतीनुसार ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर खाल्ली जाते. फक्त ही भाजी बनवताना काही पथ्ये लक्षात ठेवावीत.
हळदीची भाजी करताना त्यात अजिबात पाणी घालायचे नाही. ही भाजी पूर्णतः तुपातच शिजवायची असते, कारण हळद ही अतिशय उष्ण प्रकृतीची असल्याने तिची उष्णता नियंत्रित करणे आवश्यक असते. याच कारणासाठी आपण या भाजीत दहीदेखील वापरतो.
ही भाजी खूप निगुतीने करावी लागते आणि पूर्ण वेळ हि भाजी घाटत राहावी, नाहीतर हळद खाली लागू शकते.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओल्या हळदीची भाजी (olya haldichi bhaji recipe in marathi)
#GA4#week21#हळदी#हळदीभाजीगोल्डन अप्रोन 4 च्या पझल मध्ये row haldi हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. हळदी आणि तिचे गुण आपल्या सर्वांनाच लहानपणापासूनच माहिती आज जगभरात पसरलेली महामारी पासून भारतातील लोकांची इम्युनिटी किती स्ट्रॉंग आहे हे जगभरात सगळ्यांच्याच लक्षात आले आहे त्याचे कारण फक्त आपली खाद्य संस्कृती आपण वापरत असलेले मसाले यामुळे आपली इम्युनिटी इतकी स्ट्रॉंग आहे इम्युनिटी स्ट्रॉंग साठी सर्वात महत्वाचे ठरले तर 'हळद' काड्यात ,औषधान मध्ये बऱ्याच प्रकारे हळदीचे सेवन करून आपण या महामारी पासून वाचू शकलो तसे बऱ्याच लोकांनी केले ही काढयांचे सेवन करून स्वतःची इम्युनिटी स्ट्रॉंग केली हळदीचे आरोग्यावर खूपच चांगले परिणाम होतात. हिवाळ्यात मिळणारी बाजारात ओली हळदी पासून भाजी बनवली ही भाजी मी सतरा अठरा वर्षांपूर्वी खाल्ली पहिल्यांदा खाल्ली होती राजस्थान मध्ये आईच्या नातेवाइकांकडे आम्ही गेलो होतो तेव्हा आईच्या आत्याने ही भाजी आम्हाला जेवणात केली होती मी ऐकले की हळदीची भाजी जेवणात देणार खूपच आश्चर्य होत होते की काय जेवायला मिळणार आहे काय नाही त्यांच्या किचनमध्येच माझी लुडबुड चालू होते सगळे लक्ष माझे की भाजी करणार तरी कशी ते बघायचे होते. या पद्धतीने बनवून ठेवली तर आठ दहा दिवस ही भाजी चालते याची बनवण्याची पद्धत मधले घटक ही पौष्टिक आहे भाजी आवडली तर नक्की ट्राय करा कूकस्नॅप्ही करा Chetana Bhojak -
गरमागरम ओल्या हळदीचे दूध (olya hardhichi dudh recipe in marathi)
#GA4#week21कीवर्ड-रॉ टर्मरीकहळद या वनस्पतीचा वापर तिच्या औषधी गुणधर्मामुळे फार पुरातन काळापासून आपल्याकडे केला जातो.'हरिद्रा' असे हळदीला आयुर्वेदामध्ये नाव आहे..हळद ही जंतुनाशक म्हणून काम करते. गरमागरम हळदीचे दूध हे सर्दी-कफावर रामबाण औषध आहे. हळदीमध्ये करर्क्युमिन नावाचा घटक असतो...करक्यूमिन मध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म आहेत. Sanskruti Gaonkar -
चिकन विंदालू (chicken vindaloo recipe in marathi)
# गोवन पोर्तुगीज चिकन😋😋माणसाला प्रवासाची ओढ अर्वाचीन काळापासून आहे. माणुस जेथे जातो तेथे आपली संस्कृती घेऊन जातो. आपली भाषा, पेहराव यांच्यासोबत आपली खाद्यसंस्कृतीही माणुस आपल्या सोबत नेत असतो. या प्रवासात जगभरातील खाद्यसंस्कृती समृद्ध होत आली आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी काळीमिरीच्या ओढीने पोर्तुगीज भारतात आले, त्यांच्या खाद्यसंस्कृती सोबत आलेली एक झणझणीत डिश म्हणजे 'चिकन विंदालू'. मुळ शब्द 'विनअॅलो' (वाईन आणि लसूण) याचा अपभ्रंश होऊन 'विंदालू' शब्द बनला.माझ्या आईचे आजोळ गोव्याचे, तिथेच लहानपणी या विंदालूशी माझीओळख झाली. या रेसिपीमधे वाइन नसली तरीही हे आंबट, तिखट 'चिकन विंदालू' दर्दी खवय्यांना नक्कीच आवडेल. Ashwini Vaibhav Raut -
पौष्टिक ओल्या हळदीची भाजी (Olya haldichi bhaji recipe in marathi)
" पौष्टिक ओल्या हळदीची भाजी" ओली हळद ही आपल्या नेहमीच्या हळद पावडरपेक्षाही गुणकारी असते. म्हणून हिवाळ्यात तिचा वेगवेगळ्या प्रकारे आहारात समावेश करुन आरोग्यास फायदा करुन घ्यायला हवा. ओल्या हळदीची भाजी, लोणचं हे पदार्थ चविष्ट तर लागतातच शिवाय सुदृढ आरोग्यासाठी आवश्यकही असतात. ओल्या हळदीची राजस्थानी भाजी ही थंडीतल्या हवेला साजेशी अशी असते. त्यामुळे ती थंडीत खावीच असं आहारतज्ज्ञही सांगतात. Shital Siddhesh Raut -
शाही पनीर (shahi paneer recipe in marathi)
#GA4 #week5 #काजूआज मी एक स्पेशल रेसिपी सांगणार आहे, आता सणांचे दिवस आले आहेत तेंव्हा चांगल्या चांगल्या भाज्या करायच्या अनेक संधी येतील. ही भाजी नावाप्रमाणे शाही आहे कारण यात काजू, मलई, दही या सर्वांचा मुक्त हस्ते वापर आहे.. आणि चव तर अप्रतिम एकदम शाही... रेसिपी साठी यू ट्यूब चा आधार घेतला आहे.Pradnya Purandare
-
लहान मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#HLRलहान मेथीची भाजी खूप अशी आपल्या आहारासाठी हेल्थी अशी आहे त्यात कुठल्याही मसाल्याचा वापर न करता फक्त ती हळदी वर बनवून खा चविष्ट अशी ही भाजी आहे तुम्ही पण बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल माझ्या घरी खूप पाहुणे असल्यामुळे मी जास्त फ़ोटो नाही काढु शकले. आरती तरे -
विदर्भ स्पेशल काळा मसाला (kala masala recipe in marathi)
#KS3पदार्थाला रंग, सुवास आणि चव बहाल करणारा सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मसाला.वैदर्भीय किंवा वऱ्हाडी मसाले म्हटलं की सावजी मसाला हा हमखास आठवणारच. सावजी मसाल्याशिवाय विदर्भातल्या मसाल्यांचं वर्णन पूर्ण होऊ शकत नाही.पश्चिम महाराष्ट्रातले मसाले थोडे सौम्य असतात, उदाहरणार्थ : गोडा मसाला. मात्र, मराठवाडा, विदर्भ या भागांत काळा मसाला, कांदामसाला, लसूणमसाला हे मसाले थोडे जहाल असतात.हा काळा मसाला विदर्भातील अनेक रेसिपीज मधे वापरता येतो .जसे,सावजी चिकन ,सावजी, सावजी अंडा मसाला,सावजी डाळकांदा इ.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
शेवभाजी (shevbhaji recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र.. आपल्या महाराष्ट्र मध्ये फेमस शेवभाजी आहे..आमची फॅमिली हॉटेल मध्ये जेवायला जाते .तेव्हा पहिली ऑर्डर ही शेवभाजी असते. Shweta Kukekar -
ओल्या काजूची उसळ (Olya kajuchi usal recipe in marathi)
#KS1 #कोकण रेसिपीज..#ओल्या काजूची उसळयेवा कोकण आपलाच असा... कोकणातल्या साध्याभोळ्या अशा माणसांनी घातलेली ही साद मनाला नक्कीच सुखावून जाते.. कोकण किनारपट्टीला लाभलेले अप्रतिम स्वर्गीय असे निसर्ग सौंदर्य मैलोन् मैल पसरलेला समुद्रकिनारा नारळी-पोफळीची घनदाट झाडी टुमदार कौलारू घर आजूबाजूला अंगण परसदारी वेगवेगळी आंबा काजू नारळ पोफळी कोकम फणस अशी फळ झाडं तर अबोली कणेरी बकुळ शेवंती जास्वंद झेंडू गावठी गुलाब चाफा केवडा सुरंगी मोगरा तगर सदाफुली गोकर्ण जाई जुई इत्यादी फुलणारी फुलझाडं मन मोहून टाकतात..सुरंगीचा गजरा मला कधी मिळाला तर मी हावरटासारखी त्यावर झेप घालते..😀 या सगळ्या साधन संपत्ती मुळे, देवाच्या देणगी मुळेच कोकणाला देवभूमी आणि परशुरामांची कर्मभूमी पण म्हटले जाते. अशा या कष्टाळू काटक कोकणी माणसाचे आपल्या आंबा काजूच्या बागा नारळी पोफळीची झाडे आपले घर आपलं गाव याची मनापासून ओढ असते आणि या सर्व गोष्टींवर त्याचे मनापासून प्रेमही असते. वर्षातून एकदा तरी कोकणी माणूस आपल्या गावच्या घराला, गावाला ,त्या निसर्गसौंदर्याला, समुद्राच्या गाजेला भेट दिल्याशिवाय राहू शकत नाही. चाकरमान्यांचा मे महिना म्हणजे हक्काचा सुट्टीचा महिना आपल्या गावाला जाऊन गावच्या मेव्याचा मनसोक्त आस्वाद घेऊन तृप्त होऊन मुंबईला परततात तेव्हा आजूबाजूच्या ओळखीच्या लोकांना देण्यासाठी कोकणातून न विसरता वानवळा,वानोळा देखील आणतात बरं.. आणि असा हा वानवळा मला वरचेवर बरेच वेळा मिळालेला आहे. या वानवळ्यातला एक पदार्थ म्हणजे ओले काजू.. कोकणामध्ये चमचमीत आणि झणझणीत मसालेदार मांसाहारा बरोबरच चमचमीत आणि अतिशय रुचकर असे शाकाहारी पदार्थ पण केले जातात भरपूर नारळाचा वापर करून केलेल्या शाकाहारी पदार्थांची चव जिभेवर रेंगाळते. यामध् Bhagyashree Lele -
"सिझनल हीलिंग इम्यूनो बूस्टर सूप"(Seasonal Healing Immune Boosting Soup Recipe In Marathi)
#HV"सिझनल हीलिंग इम्यूनो बूस्टर सूप" सध्याचे हवामान आणि परिस्थिती बघता, आपल्या आणि आपल्या परिवाराच्या शरीराला खूप साऱ्या इम्यूनिटी ची गरज आहे. आणि ही इम्युनिटी आपल्याला विविध खाद्य पदार्थ आणि त्यातील पौष्टिक तत्वांनी मिळते. घरी उपलब्ध असलेल्या बऱ्याच गोष्टी आपल्याला पौष्टिकता पुरवतात, यात वापरलेले जिन्नस जसे गाजर, सेलरी, आल आणि ओळी हळद म्हणजे आयुर्वेदिक औषधी मानली जाते. काळ,वेळ आणि परिस्थिती नुसार आपण आपल्या आहारात बदल केले पाहिजे, आणि आपली रोगपरतिकारकशक्ती वाढवली पाहिजे.. तेव्हा अशीच एक रेसिपी मी इथे शेअर करत आहे, जी सर्वांना खूप सारे आरोग्यदायी लाभ करून देईल.तेव्हा या हिवाळ्यात ही सूप रेसिपी नक्की करून बघा. Shital Siddhesh Raut -
श्रावण घेवडा भाजी (shravan ghevda bhaji recipe in marathi)
श्रावण घेवडा ही श्री दत्त गुरूंची आवडती भाजी आहे.ही रेसिपी मी केरळ ला हाउस बोट वर खाल्ली होती. ह्या भाजी ला beans poriyal म्हणतात. एकदम सात्त्विक आहे . भरपूर ओले खोबरे व अजिबात मसालेदार नसल्याने चविष्ट लागते.माझ्या घरी सगळ्यांना च ही भाजी खूप आवडते. Rashmi Joshi -
झटपट पनीर भाजी (Paneer Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 पनीर हे प्रोटीन युक्त आहे ही भाजी पोळी किंवा पुरी बरोबर पण खाता येते नी करायला पण खुप सोपी आहे Manisha Joshi -
पांढरा सात्विक पुलाव (pandra satvik pulav recipe in marathi)
#कूकपॅड सर्च करा, बनवा आणि कूकस्नॅप करा या थीम साठी मी हेमा वाणे यांची पांढरा सात्विक पुलाव हि रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
शेवळी भाजी (shewali bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5शेवळी भाजी फक्त पावसाळ्यात तुम्हाला बघायला मिळेल, ही भाजी अतिशय चवीष्ट लागते . ही भाजी थोडी खाजरी असते त्यामुळे ती व्यवस्थित साफ करावी लागते. Minu Vaze -
मटार भात (Matar bhat recipe in marathi)
मटार किंवा फिश रेसिपी कूकस्नॅप करायची होती.मी लता धानापुने यांची मटार भात ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. Sujata Gengaje -
भंडारी स्टाईल पावटयाच्या शेंगाची भाजी (Pavtyachya Shenganchi Bhaji Recipe In Marathi)
#LCM1 ही भंडारी स्टाईल भाजी मी वसई मध्ये एका समारंभात टेस्ट केली होती.. आणि ती मला आवडली ही होती.. त्यामुळे ती भाजी घरी येऊन आपण बनवून बघण्याचा आणि घरातल्या मंडळी ना बनवून देण्याचा माझा प्रयत्न.... Saumya Lakhan -
तिरंगा पुलाव (tiranga pulaw recipe in marathi)
#तिरंगा४७व्या स्वातंत्र दिनाच्या निमित्ताने आज देण्यात आलेली आपली weekly theam मध्ये तिरंगा theam दिल्याबद्दल धन्यवाद.आपल्या सर्वांचे आपल्या देशाबद्दल असलेले प्रेम आपण व्यक्त करत आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे तसेच आपल्या भारत देशातील विविध राज्यांतील विविध पाककृती ने संपन्न आहे.आज तिरंगा रेसिपी करताना मी natural कलर साठी मी भाज्यांचा वापर केला आहे. यात कोणत्याही प्रकारे कृत्रिम रंग वापरले नाही.तिरंगा पुलाव हे खरे म्हटले तर एक fusion रेसिपी तयार झाली आहे. एरवी रोटी चपाती बरोबर आपण पालक पनीर ची भाजी करतो. हल्ली मुलांना आवडणारे काय ड्रेस प्रकारात शेजवान फ्राईड राईस तयार करून मी इथे तिरंगी पुलाव तयार केला आहे.चला तर मग बघुया तिरंगी पुलाव ची रेसिपी Nilan Raje -
कटाची आमटी (katachi amti recipe in marathi)
पुरणासाठी चणाडाळ शिजवून घेतल्यानंतर जे निथळलेले डाळीचे पाणी रहाते, त्याला 'कट' म्हणतात. तर मग या कटाच्या आमटी शिवाय पुरणपोळी अगदी अधुरी.. त्यामुळे ही रेसिपी शेअर करत आहे 🥰 Manisha Satish Dubal -
मायाळुची पातळ भाजी (mayalu bhaji recipe in marathi)
मायाळू हि एक रानभाजी आहे.हि भाजी पावसाळ्यात जास्त प्रमाणात दिसून येते. मायाळू थंड गुणधर्म असणारी भाजी यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.मायाळुच्या पानांची भाजी खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते, रक्तशुद्धी होते, पित्तनाशक आहे. हि पचायला हलकी असते.असे अनेक विविध गुणधर्म या भाजीत आहे. Deepali dake Kulkarni -
सिमला मिरची रस्सा भाजी (shimla mirchi rassa bhaji recipe in marathi)
#cpm6 #सहसा सिमला मिरचीची रस्साभाजी करण्यात येत नाही. परंतु आज या थीम च्या निमित्ताने सिमला मिरचीची रस्सा भाजी केलेली आहे. त्यात थोडे दही टाकल्यामुळे त्याची चव एकदम मस्त आणि वेगळी वाटते. गरमागरम पोळी सोबत खूप छान वाटते जेवणासाठी... Varsha Ingole Bele -
डाळ फ्राय, जीरा भात, पालक पनीर (dal fry,jeera rice and palak paneer recipe in marathi)
#तिरंगा आपल्या खाद्यपदार्थाची संस्कृती मध्ये एवढे नैसर्गिक भाज्या व पदार्थ रन्गीबेरंगी आहेत. त्यामध्ये रोजचे पदार्थ जसा भात, डाळ , भाजी हे पण तिरंगी बनतात. म्हणून भारतीय पदार्थाच्या परंपरेला साजेल असे डाळ फ्राय , जिरा राईस व पालक पनीर असे हे छान कॉम्बिनेशन Kirti Killedar -
मटण रस्सा (mutton rassa recipe in marathi)
#EB1#W1# विंटर चॅलेंज रेसिपीही रेसिपी माझी खास आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या Minal Gole -
इम्युनिटी बूस्टर चहा मसाला (immunity booster chai masala recipe in marathi)
#Immunity#चहामसालाआपल्या भारतात जवळपास प्रत्येक व्यक्तीची सुरुवात ही सकाळच्या चहापासून होते सकाळचा चहा हाच आपला पहिला घेतला जाणारा आहार आहे मग याची सुरुवात हेल्दी पद्धतीने केले तर बरेच फायदे होतात आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे आपल्या भारतात आपल्याला बरेच मसाले औषधी म्हणून आपल्याला उपलब्ध आहे ह्या मसाल्यांन पासून आपण आपली इम्युनिटी वाढू शकतो जादुई असे फायदे आपल्याला मिळतात अँटी वायरल आणि अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज या मसाल्यांमध्ये असते आणि भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि बरेच प्रकारचे आजार अशा प्रकारचे मसाले आहारातून घेतल्याने बरे होतात तसेच आपली पचनशक्ती, हवामानात बदलानुसार होणारे ताप, सर्दी ,खोकला या सारखे आजार बरे होतातआयुर्वेदाप्रमाणे भारतात हवामानाप्रमाणे आपले आहार निश्चित असते किती प्रमाणात घ्यायचे हे ही निश्चित असते त्याप्रमाणेच आहार घेतले तर आपण निरोगी राहू शकतो हे मसाले आपल्या भारतात घरोघरी सहज उपलब्ध होतात आणि हेच आपल्या आजारांवर आपल्याला उपयोगी पडतात मग ह्या सगळ्या मसाल्यांचा वापर करून त्यांचा चहा मसाला बनवून सकाळची सुरुवात हा चहा मसाला वापरून चहा घेऊन बऱ्याच आजारांपासून आपण लांब राहू शकतो. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी फक्त उकळत्या पाण्यात मसाला उकळून काढा प्रमाणे घेतला तरी चालते आणि ज्यांना चहा घ्यायचा आहे त्यानी दूध साखरेचा चहा बरोबर हा मसाला घेतला तरी उपयोगी आहे यात वापरले गेलेले सगळ्याच मसाल्यांचे शरीरावर चांगले परिणाम होतातजागतिक महामारी पासून नक्कीच हा मसाला वापरून आपण आपला बचाव करू शकतोआपला काढा प्रसिद्ध आहे.तर मी दाखवल्याप्रमाणे रेसिपी फॉलो करून अशा प्रकारचा मसाला तयार करून स्टोर करून ठेवू शकतो Chetana Bhojak -
व्हेज कोल्हापुरी (veg kolhapuri recipe in marathi)
# ट्रेंडिंग रेसिपीचमचमीत,चटकदार लज्जतदार मिक्स भाजी म्हटली की डोळ्यासमोर येते ती "व्हेज कोल्हापुरी " Manisha Satish Dubal -
जिरा मसाला राईस
#goldenapron3 week 11 jeeraआपल्या सर्वांच्या जेवणातील महत्त्वाचा पदार्थ म्हणून भाताची निवड केली जाते. रोजच्या जेवणात पण आमटी किंवा भाजी असली तरी थोडासा जरी भात खाल्ला तरीही पोट भरल्यासारखे वाटते. भाताचे अनेक प्रकार करतात. यामधील जिरा राईस हा फार प्रसिध्द आणि आवडीचा पदार्थ आहे. या राईस बरोबर कोणतीही आमटी किंवा भाजी खायला फारच छान लागते. याच जिरा राईस मधील जिरा मसाला राईस याची रेसिपी पुढील प्रमाणे. Ujwala Rangnekar -
खेकडा रस्सा (khekda rassa recipe in marathi)
#HLRखेकड्याचे फायदे१) खेड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम आढळतेयामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित मदत होते खेड्यातील मांसल भागांमध्येकार्बोहाइड्रेट कमी असते त्यामुळे मधुमेहग्रस्तमांसाहारींसाठी खेकडा 🦀 हा एक उत्तम पर्याय आहे यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ जरुर आहारात ठेवाही माझी खास रेसिपी आहे तुमच्या सोबत शेअर करत आहे आनंद घ्या# हेल्थी रेसिपी चॅलेंज Minal Gole -
गट्टे ची भाजी (gatte chi bhaji recipe in marathi)
#पश्चिम#राजस्थान राजस्थानची फेमस गट्ट्याची भाजी आज मी बनवणार आहे. साधारणता नी भाजी दाल बाटी सोबत केली जाते, तसेच आपण पोळी, पराठा, भाकरीसोबत खाऊ शकतो. सोपी आहे झटपट होणारी आहे आणि चवीला एकदम अप्रतिम अशी ही भाजी बनते. Gital Haria -
पनीर मखनी दम बिर्याणी (paneer makhani dum biryani recipe in marathi)
#बिर्याणीआज शुक्रवार असला तरी वटपौर्णिमा असल्याने शाकाहारी मेनू बनविण्याचे ठरले. ताजे पनीर घरात आणलेले होते त्याची पनीर बिर्याणी करायचे असे ठरवले. या रेसिपीला सुरुवात करणार इतक्यात cookpad वर बिर्याणीची थीम आली. बिर्याणी हा मुख्यतः मटण अथवा चिकन सोबत केला जाणारा पदार्थ आहे. परंतु या मोगलाई डिशला अस्सल भारतीय टच देऊन अतिशय चविष्ट अशी शाकाहारी बिर्याणी सुद्धा आपण करू शकतो.पनीर मखनी दम बिर्याणीची रेसिपी आपल्या समोर माझ्या पद्धतीने सादर करीत आहे. Ashwini Vaibhav Raut -
चांदण गोंदण (पारंपारिक तोंडलीभात) (tondali baht recipe in marathi)
#रेसिपीबुक#week6चंद्र हा काही आपल्या संस्कृतीचा भाग वगैरे नाही. चंद्र ही आपली संस्कृती आहे. सूर्य प्रमुख उर्जा स्त्रोत म्हणून आपल्याला पित्याच्या जागी आहे. पण चंद्र आपले जीवन चक्र आहे. आपला महीना प्रतिपदेपासून सुरू होतो आणि अमावास्येला संपतो. संकष्टी असो वा करवाचौथ चंद्राशिवाय आपले 'पान' हलत नाही, तो प्रत्यक्ष चंद्रच आज पानात आणायचा होता...टास्क कठिण होता, पण चंद्राशी असलेली आपली जुनी ओळख कामी आली. कपाळावर कुंकू लावण्याची आपली अर्वाचीन परंपरा. दोन भुवयांमधे, सहस्रार चक्रावर लावली जाणारी चंद्रकोर आपले ब्रम्हांडाशी नाते जोडते. आपण महाराष्ट्रातील महिला पारंपारिक पद्धतीने कपाळावर चंद्रकोर रेखाटतो, ती चंद्रकोर डोळ्यापुढे ठेवली. अर्थात पुढे पारंपारिक जिन्नस आणि त्यांची कलात्मक मांडणी यातून ताटात चंद्रकोर साकारली.मांडणी इतकाच रेसिपी देखिल पारंपारिक आहे, आपल्या मातीशी नाते सांगणारी... Ashwini Vaibhav Raut -
गुजराती खिचड़ी (gujarati khichdi recipe in marathi)
#kr2017 मध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खिचडीला राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून घोषणा केली बरेच मीडियावर खिचडीची चर्चा झाली खिचडी खूप चर्चेत आली आणि खूप प्रचलित झाली, नव्या जनरेशन साठी खिचडी अजून वरून चढून समोर आली . मला आठवते मी न्युजवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अमेरिकेत गेले असताना त्यांना शेफ विकास खन्ना यांनी इतक्या अप्रतिम पद्धतीने खिचडी सर्व केली ती प्लेटिंग मला आजही आठवते, मास्टर शेफ या कार्यक्रमात त्यांनी त्यांच्या एका भागात प्लेटिंग दाखवली होती, खूपच अप्रतिम होती आपण विचार ही नाही करणार अशी इंटरनॅशनल लेवल ची होती ती खिचडी चर्चा केल्यावर असे बरेच आपण पाहिलेले चर्चेत असलेले व्यक्ती आपल्याला आठवतात. जगभरात भारताची खिचडी आपल्या शेफ ने प्रसिद्ध केली आहे.भारतात प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे धान्य वापरून खिचडी तयार केली जाते खिचडीचा मुख्य धान्य तांदूळ असून त्यात वेगवेगळ्या प्रकारचे डाळी कडधान्य वापरून खिचडी तयार केली जातेही आरोग्यासाठी पोष्टिक आहे पचायला ही अगदी हलकी आणि प्रोटीन युक्त आहे मी तयार केलेली खिचडी चा प्रकारात गुजरात मध्ये सर्वात जास्त तयार केला जातो गुजराती लोकांमध्ये या पद्धतीची खिचडी तयार केली जाते. गुजराती थाळी जेवतानाही आपल्याला ही ताटात वाढली जाते.मला ही खिचडी जास्त आवडते. या खिचडीत भरपूर तूप टाकून खाल्ले तर अजून छान लागते आमची आजी खिचडीत मध्ये खड्डा करून त्यात तूप भरून खिचडी खायची ती स्वतः खायची आम्हाला ही सांगायची अशाप्रकारे खिचडी खायची. Chetana Bhojak
More Recipes
टिप्पण्या (8)