चवळी च्या शेंगांची भाजी (chavli chya shengyachi bhaji recipe in marathi)

Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104

#चवळीच्या शेंगाची भाजी मला चांगल्या प्रकारे आवडते.त्यावर लिंबू पिळून जेवण करावे.

चवळी च्या शेंगांची भाजी (chavli chya shengyachi bhaji recipe in marathi)

#चवळीच्या शेंगाची भाजी मला चांगल्या प्रकारे आवडते.त्यावर लिंबू पिळून जेवण करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि.
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 पावचवळी च्या शेंगा
  2. 1कांदा
  3. 5-6लसूण पाकळ्या
  4. 1 इंचअद्रक
  5. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  6. 1/4 टीस्पूनहळद
  7. 1 टीस्पूनतिखट
  8. 1/4 टीस्पूनमसाला
  9. चवीनुसारमीठ
  10. कोथिंबीर
  11. आवश्यकतेनुसार पाणी
  12. 2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

30 मि.
  1. 1

    शेंगा तोडून घेतल्या.पाण्याने स्वच्छ धुऊन घेतल्या.कांदा बारीक चिरून घेतला.लसूण व अद्रक खलबत्या मध्ये बारीक करून घेतले.

  2. 2

    गॕसवर कढई ठेवून त्यात तेल टाकले.गरम झाल्यावर जीरेमोहरी कांदा बारीक केलेले लसूण अद्रक टाकले व चांगल्या प्रकारे फिरवून घेतले.नंतर कढईत हळद तिखट मसाला मीठ टाकून परतून घेतले.

  3. 3

    कढईत शेंगा टाकल्या व आवश्यक तेवढे पाणी टाकून चांगले परतून झाकण ठेऊन शिजू दिले.भाजी तयार झाली कोथिंबीर सोडली.

  4. 4

    भांड्यात भाजी काढून वरून कोथिंबीर टाकून सर्व्ह करता येईल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (5)

Cook Today
Dilip Bele
Dilip Bele @dilip_0104
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes