पांढरा सात्विक पुलाव (pandra satvik pulav recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#cpm4
#हा पुलाव कांदा लसूण नसल्याने तुम्ही नैवेद्य म्हणून करू शकता .करायला सोपा नी मुलांना खायला आवडतो तिखट जास्त होत नाही.

पांढरा सात्विक पुलाव (pandra satvik pulav recipe in marathi)

#cpm4
#हा पुलाव कांदा लसूण नसल्याने तुम्ही नैवेद्य म्हणून करू शकता .करायला सोपा नी मुलांना खायला आवडतो तिखट जास्त होत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 1/4 कपमटार
  3. 1/4 कपगाजर
  4. 1/4 कपफ्लाॅवर
  5. 1/4फरसबी
  6. 1 टीस्पूनशहाजीरे किंवा जीरे
  7. 4लवंगा
  8. 8-10काळीमीरी
  9. 2वेलची
  10. 2दालचीनी तुकडे
  11. 2तमालपत्र
  12. 10-15काजू तुकडा
  13. 7-8मनूका
  14. 1/2 टीस्पूनकाळीमिरी पुड
  15. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  16. 2 टीस्पूनमीठ
  17. 3/4 टेबलस्पूनतुप

कुकिंग सूचना

30मिनिटे
  1. 1

    तांदूळ दोन तिन पाण्याने धुवून 30मिनिटे भिजत ठेवा.एका पातेल्यात 4 कप पाणी 1टीस्पून मीठ टाकून तापत ठेवा.

  2. 2

    खालीलप्रमाणे भाज्या चिरून घ्या.

  3. 3

    पाणी उकळत आले की 1टीस्पून तुप घाला नी तांदूळ पाणी काढून त्यामधे घाला.साधारण 10/11 मिनीटात तांदूळ पुर्ण शिजतो.तो आता पाण्यातून काढून चाळणीत ओता नि पाणी निघून गेले की एका ताटात पसरवून ठेवा.

  4. 4

    पाणी उकळत ठेवा उकळले की त्यात चिरलेल्या भाज्या घाला नि दोन मिनीटात गॅस बंद करा पाणी काढून टाका कि त्यात थंड पाणी घाला म्हणजे भाज्यांचे रंग तसेच राहतात.नंतर थोड्या वेळाने पाणी काढून भाज्या चाळणीत ठेवा.

  5. 5

    एक कढई तापत ठेवा त्यात 2 टेबलस्पून तुप घाला तापले की तमालपत्र,काळीमीरी,
    लवंग,दालचीनी घाला परता काजू घाला गुलाबी झाले कि शहाजीरे घाला नि नंतर भाज्या नी दोन तिन मिनिटे परतावे लगेचच ताटात पसरवलेला भात घाला,लिंबाचा रस घाला, काळीमीरी पुड घाला नी छान परता.

  6. 6

    पांढरा सात्विक पुलाव तयार आहे.मुलांना असाच आवडतो.तुम्ही कढी खाऊ शकता किंवा असाच पण छान लागतो.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes