फ्राईड चिकन ड्रमेट इन सांबाल पेस्ट (Fried Chicken Dramate in Sambal Paste recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

फ्राईड चिकन ड्रमेट इन सांबाल पेस्ट (Fried Chicken Dramate in Sambal Paste recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 600 ग्रॅमचिकन ड्रमेटस
  2. 1 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  3. चवीनुसारमीठ
  4. 1अंड
  5. 1 टेबलस्पूनकॉर्नफ्लोअर
  6. 2 टेबलस्पूनमैदा
  7. 1 टीस्पूनसोयासॉस
  8. 1 टेबलस्पूनचिली सॉस
  9. 1 टेबलस्पूनटोमॅटो केचप
  10. 1 टेबलस्पूनब्राऊन शुगर
  11. आवश्यकतेनुसार तेल
  12. 2 टेबलस्पूनसांबाल पेस्ट

कुकिंग सूचना

  1. 1

    मी इथे साडेतीनशे ग्राम चिकन ड्रमेट घेतले आहेत आणि एक चिकन ब्रेस्ट थोडे मोठे तुकडे करून घेतला आहे... चिकन मध्ये काळमीरी पावडर, मीठ आणि अंड घालून मिसळा... मग त्यात मैदा, कॉर्नफ्लोर आणि आलं लसूण पेस्ट घालून मिसळा...

  2. 2

    मग त्यात सोयासॉस घाला... मी वापरलेला सोयासॉस अनसॉल्टेड आहे... तुमच्या सोयासॉस मध्ये मीठ असेल तर आधी असलेल्या मिठाचे प्रमाण कमी करा... सर्व व्यवस्थित मिसळून दहा-पंधरा मिनिटे तसेच राहू द्या...

  3. 3

    मध्यम आचेवर चिकन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्या...

  4. 4

    हे चिकन फक्त असच खायला सुद्धा छान लागतं...

  5. 5

    पॅनमध्ये साधारण एक टीस्पून तेल घालून त्यात चिली सॉस, टोमॅटो केचप आणि ब्राऊन शुगर घालून विरघळवून घ्या... मग त्यात फ्राय केलेला चिकन घालून व्यवस्थित ढवळून घ्या...

  6. 6

    सांबाल पेस्ट किंवा सॉस थोडा जास्त तिखट असतो... लहान मुलं असतील तर किंवा कमी तिखट खायची सवय असेल तर ह्या प्रोसिजर पर्यंत थांबू शकता... हे असं सुद्धा खूप छान लागतो...

  7. 7

    मग त्यात सांबाल पेस्ट घालून व्यवस्थित मिसळून घ्या... संपूर्ण प्रोसिजर मध्ये गॅसची फ्लेम लहानच ठेवा... सांबाल पेस्ट व्यवस्थित मिसळल्यानंतर गॅस बंद करा... सांबाल पेस्ट तशी बऱ्याच ठिकाणी मिळते, तरीही नाहीच मिळाली तर सांबाल ऐवजी तुम्ही शेजवान सॉस सुद्धा वापरू शकता... चव थोडी वेगळी आहे, पण जवळपास जाते...

  8. 8

    आपले फ्राईड चिकन ड्रमेटस इन सांबाल पेस्ट तयार आहेत...

  9. 9

    एक जबरदस्त चटपटीत आणि झणझणीत स्टार्टर डिश आहे... तिखट खायची आवड असणाऱ्यांना ही डिश नक्की आवडेल...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes