डोनट (donut recipe in marathi)

डोनट (donut recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
दूध जास्त गरम करू नका आपण त्यात आपले बोट टाकले तर बेकर होईल एवढेच गरम करा याला ब्लड टेम्परेचर म्हणतात).
- 2
दूध कोमट गरम करून घ्या.टोटल दुधा मधले अर्ध दुध सेपरेट बाऊलमध्ये काढा. त्यात दोन चमचे साखर आणि ईस्ट टाकून मिक्स करून झाकून दहा मिनिट सेट होऊ द्या, त्यामुळे आपले ईस्ट ॲक्टिव होईल.
- 3
आता आपण ओले इन्ग्रेडियंट एकत्र करून घेऊ, बाजूला काढून ठेवलेल्या अर्ध्या दुधामध्ये सॉल्टेड बटर, व्हॅनिला इसेन्स आणि पाणी ऍड करून चांगले एकत्र करून घ्या.
- 4
मी डो बनवण्यासाठी आटा मेकर चा वापर केला आहे, तुमच्याकडे आटा मेकर नसेल तर तुम्ही हातानेच चमचा युज करून डो बनवू शकता. मैद्यात मीठ आणि साखर ऍड करून चांगले मिक्स करून घ्या.
- 5
आता मैदा मध्ये ऍक्टिव्ह झालेले ईस्ट चे मिश्रण आणि एकत्र केलेले बटर आणि दुधाचे मिश्रण ऍड करून चांगले मळून डो बनवून घ्या.
- 6
आता एका सपाट प्लॅटफॉर्मवर किंवा किचन ओट्यावर थोडासा मैदा स्प्रिंकल करा त्यावर डो टाका आणि वरतून थोडा मैदा स्प्रिंकल करून दोन मिनिट हाताने मोळून घ्या. नंतर एका बाउलला तेल लावून त्यामध्ये तयार केलेला डो ठेवा वरतून रॅपिंग पेपरने रॅप करून घ्या, किंवा झाकण ठेवून दोन तास राईज होऊ द्या.
- 7
किचन ओट्यावर मैदा स्प्रिंकल करून त्यावर डो ठेवा आणि एक सेंटिमीटर जाडी मध्ये लाटून घ्या. ग्लासच्या आणि बॉटल च्या झाकणच्या च्या साह्याने डोनट्सचा शेप तयार करून घ्या.
- 8
बेकिंग ट्रे मध्ये कट केलेले डोनट्स ठेवा. आणि वीस मिनिट राईस होण्यासाठी झाकून ठेवा, त्यानंतर ब्रशच्या साहाय्याने त्यावर बटर लावा आणि तेरा ते पंधरा मिनिट 170 डिग्री वर प्रि-हीट केलेल्या ओटीजी किंवा ओवन मध्ये बेक करून घ्या(तुम्ही गॅस वर पण भांड्या मध्ये मीठ ठेवून बेक करू शकता)
- 9
- 10
डोनट्स बेक होईपर्यंत आपण ग्लेज बनवून घेऊ त्यासाठी पिठी साखर मध्ये व्हॅनिला इसेन्स आणि पाणी ऍड करून रनिंग ग्लेज बनवून घ्या.
- 11
डोनट्स बेक झाल्यानंतर त्यांना गरम गरम ग्लेजमध्ये दोन्ही बाजूंनी बुडवून घ्या. आणि एक्स्ट्रा ग्लेज नितरण्यासाठी प्लेटमध्ये ठेवा आता आपल्या आवडीनुसार डोनट्सला वेगवेगळ्या ग्लेज मध्ये डिप करा.
- 12
आणि गरम गरम डोनट्स एन्जॉय करा
Keywords
Similar Recipes
More Recipes





























टिप्पण्या (6)