मावा गूजिया (mawa gujiya recipe in marathi)

मावा गूजिया (mawa gujiya recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम सर्व साहित्य मोजून काढून घ्यावे. सारण बनवण्यासाठी सुजी खोबरे मावा काजू बदाम पिस्ता चे काप मंद आचेवर भाजून घ्यावे जेणेकरून त्यातील कच्चेपणा निघून जाईल.
- 2
सर्व मिश्रण थोडे थंड झाल्यावर त्यात पिठीसाखर घालावी व चांगले मिक्स करून घ्यावे आता आपले सारण तयार आहे.
- 3
तयार झालेले सारण बाजूला ठेवून द्यावे.
- 4
आता मैदा एका मोठ्या भांड्यात घेऊन त्यात मीठ चार ते पाच चमचे तूप घालून अलगद हाताने मिक्स करावे नंतर थोडे पाणी घालून घट्ट भिजवून घ्यावे आणि दहा मिनिटे ओल्या कापडाने झाकून ठेवावे.
- 5
आता झाकून ठेवलेल्या मिश्रणाचे छोटे गोळे करून मध्यम जाडीची पुरी लाटून घ्यावी. लाटलेल्या पुरी मध्ये हे एक ते दीड छोटा चमचा सारण घालून समोरासमोरील बाजू एकमेकांना चिकटवून घ्याव्यात. अशाप्रकारे सर्व गुजिया बनवून घ्याव्यात.
- 6
गुजिया बनवून झाल्यानंतर तेल किंवा तूप गरम करून मंद आचेवर तळुन घ्याव्यात.
- 7
आता एका पॅनमध्ये एक वाटी साखर व अर्धी वाटी पाणी घालून गॅसवर गरम करावे. साखर विरघळल्यानंतर चिकट असा पाक बनवून घ्यावा. पाक तयार झाल्यावर गॅस बंद करावा आणि तळलेले गुजिया पाकात घालाव्यात.
- 8
दहा मिनिटे पाकात ठेवून नंतर बाहेर काढून एका प्लेटमध्ये काढाव्यात आणि वरून पिस्ता काप घालून सजवावे. तयार आहेत चाशणी वाल्या मावा गुजिया.
- 9
Top Search in
Keywords
Similar Recipes
More Recipes





















टिप्पण्या