पनीर मेथी बुर्जी (paneer methi bhurji recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#GA4#week 6
मेथीची भाजी थोडी कडवट असल्यामुळे बऱ्याच लोकांना आवडत नाही. पनीर घालून केल्यास अजिबात कडवट लागत नाही. आवडीने खातात

पनीर मेथी बुर्जी (paneer methi bhurji recipe in marathi)

#GA4#week 6
मेथीची भाजी थोडी कडवट असल्यामुळे बऱ्याच लोकांना आवडत नाही. पनीर घालून केल्यास अजिबात कडवट लागत नाही. आवडीने खातात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅम पनीर
  2. 250 ग्रॅम मेथी
  3. 2 मध्यम आकाराचे कांदे
  4. 6-7लसूणच्या पाकळ्या
  5. 4-5हिरव्या मिरच्या
  6. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनमीठ
  9. 3 टेबलस्पूनतेल
  10. 1 टेबलस्पूनजिरं

कुकिंग सूचना

20मिनिट
  1. 1

    मेथी निवडून स्वछ धुऊन कोरडी करून बारीक चिरून घेणे. कंदा व मिरची पण बारीक चिरून घेणे. पनीर किसून घ्यावे.लसूण सोलून बारीक चिरून घ्यावा.

  2. 2

    गॅस वर कढईत तेल गरम करून जिरे घालावे ते तडतडल्यावर मिरची व लसूण घालून कांदा घालावा मीठ आणि हळद घालून रंग बदले पर्यत परतून घावें मेथी घालावी. लाल मिरची पावडर घालून ढवळावे.

  3. 3

    मेथी शिजल्यावर त्यात किसलेले पनीर घालून दोन तीन मिनिट ढवळून घावी

  4. 4

    पनीर मेथी बुर्जीतयार. गरमगरम फुलक्या बरोबर खावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes