जत्रेतील प्रसिद्ध आईस हलवा (ice halwa recipe in marathi)

माझ्या माहेरी कोकणात महाशिवरात्रीला जत्रा भरते तेव्हापासूनच हा आईस हलवा माझा प्रचंड आवडीचा...😊
जेव्हा कधी जत्रेत गावी जायची संधी मिळते ,तेव्हा हा आईस हलवा आवर्जून मी विकत घेते...😊
कुकपॅडच्या नवनवीन थीममुळे हा आईस हलवा पहिल्यांदाच माझ्या किचनमधे मी बनवून पाहिला ,घरी सर्वांना फार आवडला ..😊
चला तर मग पाहूयात रेसिपी ...

कुकिंग सूचना
- 1
मिक्सिंग बाऊलमधे मैदा,साखर,तूप,दूध छान एकत्र करून मिक्स करून घ्या.
- 2
नाॅनस्टिक पॅनमधे हे मिश्रण ओतून आणि मध्यम ठेऊन सतत ढवळत राहा.याकरिता नाॉनस्टिक पॅनच वापरा.
- 3
मिश्रण घट्टसर होत आले की त्यात इसेन्स थेंबभर,पिवळा रंग घालून छान एकत्र करा.
- 4
हळूहळू मिश्रण तूप सोडू लागेल आणि मिश्रण घट्टसर होऊ लागेल.
- 5
मिश्रणाचा गोळा झाला की गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्यावे.
- 6
थंड झाल्यावर हाताने गोळा तयार करून बटर पेपरवर पातळसर लाटून घ्यावे. वरून बदाम, पिस्त्याचे काप,केसर घालून पुन्हा लाटून घ्या. आणि लगेचच चौकोनी आकारात कट करा. १ ते २ तसेच ठेऊन छान सेट होऊ द्या.
- 7
बटर पेपर कट करून आईस हलवा सर्व्ह करा. खायला तयार आहे स्वादिष्ट आईस हलवा..😋😋
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)