वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजी (vanga batata kolambi tawa bhaji recipe in marathi)

सर्व ऋतू मध्ये मिळणारी हमखास भाजी म्हणजे वांग. सोबतच बटाटा व कोलंबी घालून केलेली झणझणीत अशी वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजीभाजी.
#cpm5
वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजी (vanga batata kolambi tawa bhaji recipe in marathi)
सर्व ऋतू मध्ये मिळणारी हमखास भाजी म्हणजे वांग. सोबतच बटाटा व कोलंबी घालून केलेली झणझणीत अशी वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजीभाजी.
#cpm5
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वांग व बटाटे बारीक तुकडे करून पाण्यात 5 ते 8 मिनिट भिजत ठेवावे म्हणजे ते काळे पडत नाही व चव ही सुंदर लागते.
- 2
कोलंबी साफ करून स्वच्छ पाण्याने धुवून घेतली व थोडं मीठ ऍड केले. मग एक तवा ठेवून त्यात अर्धा चमचा तेल घालून व कडीपत्ता घालून कोलंबी २ मिनिटे फ्राय करून घ्यावी. मग ती दुसऱ्या डिश मध्ये काढावी.
- 3
मग तव्यावर दीड चमचा तेल घालून त्यात कांदा व टोमॅटो चांगला परतवून घ्यावा मग त्यात सर्व मसाले ऍड करावेत चांगले मिश्रण एक जीव करावेत. मग त्यात बटाटा व वांगे ऍड करावे व चांगले शिजवून घ्यावे मग त्यात कोलंबी टाकून ढवळून घ्यावे. मग त्यात चवीनुसार मीठ ऍड करावेत. वरून कोथिंबीर टाकावी. तयार वांगे, बटाटा, कोलंबी तवा भाजी.
- 4
भाकरी, रोटी, चपाती सोबत ही भाजी खूप छान लागते.
- 5
Keywords
Similar Recipes
More Recipes
- गावरान चिकन रस्सा (ग्रेव्ही) (gavran chicken rassa recipe in marathi)
- गुलाबजाम (gulab jamun recipe in marathi)
- टु लेअर कलाकंद बर्फी (two layer kalakand barfi recipe in marathi)
- गावरान चिकन ग्रेव्ही (gavran chicken gravy recipe in marathi)
- मोडाच्या मुगाचे थालीपीठ (moongache thalipeeth recipe in marathi)


















टिप्पण्या (2)