टु लेअर कलाकंद बर्फी (two layer kalakand barfi recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#उपवास_स्पेशल_रेसिपी

"टु लेअर कलाकंद बर्फी"
ही माझी 251 वी रेसिपी आहे.. म्हणून गोड रेसिपी बनवली आणि आज आषाढी एकादशी निमित्त गोडाची रेसिपी..😋

टु लेअर कलाकंद बर्फी (two layer kalakand barfi recipe in marathi)

#उपवास_स्पेशल_रेसिपी

"टु लेअर कलाकंद बर्फी"
ही माझी 251 वी रेसिपी आहे.. म्हणून गोड रेसिपी बनवली आणि आज आषाढी एकादशी निमित्त गोडाची रेसिपी..😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
सात आठ
  1. पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  2. 1 लिटरदूध
  3. 1/4 कपपाणी
  4. 2 टेबलस्पूनव्हाईट व्हिनेगर
  5. मिठाई बनवण्यासाठी लागणारे साहित्य
  6. 1/2 कपसाखर
  7. 1/2 कपदुध
  8. 2 टेबलस्पूनमिल्क पावडर
  9. 7-8केशराचे तुकडे
  10. सजावटीसाठी आवडीनुसार ड्रायफ्रुट्स

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    पातेल्यात दुध गरम करण्यासाठी ठेवा.. छोट्या वाटी मध्ये व्हिनेगर काढून घ्या त्यात पाणी घालून मिक्स करा.दोन, तीन टेबलस्पून गरम दुध एका वाटीमध्ये काढून त्यात केशर काड्या भिजत ठेवा..

  2. 2

    दुधाला उकळी आल्यावर गॅस बंद करा.. चार पाच मिनिटे हलवत रहा, थोडे थंड झाल्यावर त्यात थोडे थोडे व्हिनेगर चे पाणी घालून हलवत रहा... हळूहळू दुध फाटेल.. एका कढईत अर्धा लिटर दूध उकळत ठेवा,ते अर्ध्या पेक्षा कमी करायचे आहे... मधेमधे ढवळत रहा..

  3. 3

    पातेल्यावर चाळण ठेवा त्यात एक काॅटनचा रुमाल घालून घ्या व फाटलेले दुध ओतून घ्या.. म्हणजे पाणी खाली गळून रुमालात पनीर जमा होईल..ते दोन तीन वेळा पाणी घालून धुवून घ्या व ट्विस्ट करून त्यातील सगळे पाणी काढून टाका व पाच मिनिटे तसेच ठेवा. मिठाई साठी दुध आटवायला ठेवले आहे ते अधुनमधून हलवत रहा.

  4. 4

    आता पनीर वाटी मध्ये काढून घ्या व स्मॅशरने चांगले स्मॅश करून घ्या

  5. 5

    आपले दुधही मस्त आटून घट्ट झाले आहे.. अर्धे झाले आहे

  6. 6

    आता या दुधामध्ये थोडी थोडी साखर टाकून हलवत रहा.. अर्धा कप साखर सहा सात वेळा थोडी थोडी टाकत हलवत रहा..

  7. 7

    आता पनीर टाकून हलवत चांगले मिक्स करा.. मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे..

  8. 8

    आता दोन टेबलस्पून मिल्क पावडर घालून चांगले मिक्स करा..व मिश्रणाचे दोन भाग करून एक भाग वाटी मध्ये काढून घ्या व एक भाग कढईत च राहुद्या

  9. 9

    कढई मधील मिश्रणात केशर भिजवलेले दुध घालून मिक्स करा..परत मिश्रण थोडे ओलसर होईलपण बारीक गॅसवर हरवत रहा..त्याचा घट्ट गोळा तयार होईल.. अशा तऱ्हेने मिठाई बनवण्यासाठी आपले दोन कलरचे मिश्रण तयार होईल..

  10. 10

    आता एका प्लेटला तुप लावून घ्या, कुकी कटर घेऊन त्याला ही तुपाचा हात लावून घ्या..कुकी कटर प्लेटमध्ये ठेवून आधी व्हाईट मिश्रण चमच्याने दाबून दाबून भरा आणि वर केशरी मिश्रण भरून घ्या, दाबून घ्या..व आतुन चमच्याने प्रेस करत अलगद कुकी कटर वरच्या बाजूला काढून घ्या.. किंवा पिवळे मिश्रण खाली व व्हाईट मिश्रण वर या पद्धतीने पण बनवु शकता... अशा पद्धतीने आपली टु लेअर कलाकंद बर्फी तय्यार झाली आहे..याच पद्धतीने सगळी बर्फी बनवुन घ्या व पिस्त्याचे काप, केशर काड्या, काजू बदाम काप लावून.. सजावट करुन घ्या..

  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes