उकडीचे मोदक (ukadiche modak recipe in marathi)

श्रावण संपत आला की चाहूल लागते ती बाप्पाच्या आगमनाची.लहाणापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा असा हा आपला सण आणि बाप्पाला नैवेद्य म्हणून आवडतात ते मोदक तेही उकडीचे,चला तर मग आज आपण उकडीचे मोदक करूया.
#gur

कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका टोपात एक चमचा तूप घालून त्यात गूळ घालावा.
- 2
गुळ थोड वितळले की चूण घाला ढवळत रहा.सुकत आलं की गॅस बंद करावा.सारण तयार झाले.
- 3
मग टोपात 1बाऊल पाणी घालून त्यात 1चमचा तूप,थोडंसं गूळ आणि मीठ घालून मिक्स करावे.
- 4
पाणी उकळले की त्यात पीठ घाला ढवळा मिनिटभर झाकून ठेवावे,मग
- 5
गॅस बंद करावा आणि थोडं गरम असतानाच परातीत काढून मळा.
- 6
मग हाताला तूप लावून एक गोळा घेऊन मोदकांची पारी करावी,त्यात सारण भरावे.
- 7
मग मोदक करावेत,अकरा ते बारा मोदक दिलेल्या साहित्यात होतात.
- 8
मग पॅन गॅस वर ठेवून त्यात हळदीची पानं घालून त्यात मोदक ठेवा.
- 9
वर झाकण ठेवून पंधरा मिनिटे वाफवून घ्यावेत.मोदक तयार.
- 10
बाप्पाच्या नैवेद्यासाठी मोदक तयार आहेत
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या (2)