सोया व्हेजि मोमोस (soya veg momos recipe in marathi)

#स्टीम
आपण व्हेज मोमोस नेहमी बनवतात आज मी काहीतरी वेगळं करावं म्हणून त्यांत सोयाबिन चा वापर केला आहे, खाण्या साठी एकदमच नवीन आणि चविष्ट असा हा पदार्थ बनतो.

कुकिंग सूचना
- 1
प्रथम सोया पाण्यात २० मिनिटे भिजवून ठेवावे आणि नंतर बारीक कापून घ्यावे
- 2
मैद्या मध्ये तेल मीठ घालून पीठ छान भिजवून ठेवावे
- 3
कढईत तेल गरम करून त्यांत कांदा, आले, लसूण, मिरची परतून घ्यावी. नंतर त्यात सर्व भाज्या आणि सोया घालून परतावे.मीठ, मीरी पूढ, सोया सोस घालून परतून सारण एका भांड्यात काढून घ्यावे.
- 4
भिजवलेल्या मैद्याची पुरी लाटून घ्यावी,पुरीत सारण भरून मोदकांच्या आकाराचे मोमोस करून घ्यावे व इडली पात्रात तेल लावून सर्व मोमोस १० मिनिटे उकडून घ्यावे
- 5
मोमोस चटणी व कॅचप सोबत सव्ह करावे.
Keywords
Similar Recipes
More Recipes

टिप्पण्या