# बांबुच्या कोंबांची रस्सा भाजी

रस्सा म्हटल्या की खूप प्रकारच्या भाज्या आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात परंतु बांबूच्या कोंबांची भाजी जराशी तुरट पण नाविन्यपूर्ण आणि नेहमी न मिळणारी अशी भाजी.
# बांबुच्या कोंबांची रस्सा भाजी
रस्सा म्हटल्या की खूप प्रकारच्या भाज्या आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात परंतु बांबूच्या कोंबांची भाजी जराशी तुरट पण नाविन्यपूर्ण आणि नेहमी न मिळणारी अशी भाजी.
Steps
- 1
प्रथम बाजारातून आणलेल्या बांबूच्या कोंबाची भाजी, नीट साफ करून बारीक चिरून घ्यावी.
- 2
नंतर कढईत एक चमचा तेलात एक उभा चिरलेला कांदा चार-पाच लसूण पाकळ्या आणि वर दिलेला सर्व खडा मसाला धणे,बडीशोपेसह नीट परतून घ्यावा. त्याचप्रमाणे बारीक किसून घेतलेला ओला नारळ ही खमंग परतून घ्यावा
- 3
वरील परतून घेतलेला गरम मसाला आणि खोबरे यांचे मिक्सरमध्ये नीट बारीक वाटण करून घ्यावे
- 4
नंतर कढईमध्ये थोडे तेल गरम करून उरलेल्या कांद्यांमधला एक कांदा तेलामध्ये परतून घ्यावा त्यावर चिरलेली बांबूची भाजी उरलेला कांदा, हळद,मिरची आणि गरजेप्रमाणे मीठ व थोडे पाणी घालून सर्व दहा मिनिटं मंद आचेवर शिजत ठेवावे.
- 5
वरून घातलेला कच्चा कांदा आणि बांबू हे दोन्ही शिजल्यावरती त्यात वाटून घेतलेले खोबऱ्याचे वाटण आणि गरजेप्रमाणे मीठ गूळ आणि कोकम आगळ टाकून छान उकळ काढून घ्यावी.
- 6
वरून कोथिंबीर घालून छान गरम गरम भात अथवा तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावे.
टीप:-ही रस्सा भाजी दोन-तीन तास मुरल्यानंतर आणखीनच छान लागते त्यामुळे संध्याकाळी खायची असल्यास दुपारी करावी.
Similar Recipes
More Recipes
-

Scott Kane
-

Gracious Kitchen
-

Beetroot Salad with Corn and Pomegranate
Gracious Kitchen
-

Shainuu Aroraੴ
-

Sudha Agrawal
-

Aishwarya Kitchen A
-

⚡Welderwoman⚡
-

Tom Barnard
-

Felice
-

California Farm Fresh Thick Sweet Soy Sauce: Ketjap Manis
Hobby Horseman
-

Gurpal kaur Ubhi's {Heavenly Jewel Kitchen}
-

Manisha Malvi Angaitkar
-

Sanuber Ashrafi
-

Jenta Baker's Confectionery
-

Kalpana Rai
-

Sudipa Gope
-

vibs
-

Mamta Shah
-

Eric Groskopf
-

Anam Sayyed























Comments