आंब्याचा जॅम

Durga Uday Popat Thakkar
Durga Uday Popat Thakkar @cook_18992509

#DP

आंब्याचा जॅम

#DP

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. आंबा
  2. साखर
  3. लिंबू

कुकिंग सूचना

  1. 1

    आंब्याचा रस काढून मिक्सरमधून फिरवून छान गुळगुळीत करून घ्या. आणि तो रस वाटीने मोजून घ्या.

  2. 2

    तीन वाट्या आमरस असेल तर अर्धी वाटी साखर लागेल

  3. 3

    एका पसरट आणि खोलगट अश्या पॅनमधे आमरस आणि साखर नीट एकत्र करून मंद गॅसवर ठेवा.

  4. 4

    मिश्रणाला एक उकळी आली की त्यात लिंबाचा रस घाला. तीन वाट्या आमरस आणि अर्धी वाटी साखर या प्रमाणासाठी दोन लिंबांचा रस पुरेसा होतो.

  5. 5

    मिश्रण सतत ढवळत रहा.

  6. 6

    उकळी आल्यानंतर साधारण दहा मिनिटांनी मिश्रणाचे शिंतोडे उडण्याचे बंद होईल, आणि मिश्रण खदखदायला लागेल. त्यानंतर लगेचच ते चकचकीत दिसायला लागेल की मग गॅस बंद करा. जॅम तयार आहे.

  7. 7

    ते मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावर नीट ढवळून (खरंतर कालवून) एकत्र करा, आणि कोरड्या बाटलीत भरून ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Durga Uday Popat Thakkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes