स्वीट कॉर्न सूप

Durga Uday Popat Thakkar
Durga Uday Popat Thakkar @cook_18992509
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. २ कप स्वीट कॉर्नचे दाणे (कच्चे)
  2. १ टीस्पून बटर
  3. २ ते ३ टेस्पून भोपळी मिरची, मध्यम चिरून
  4. २ ते ३ टेस्पून गाजर, मध्यम चिरून
  5. २ टेस्पून कोबी, चिरून
  6. १ टेस्पून कॉर्न फ्लोअर
  7. १/४ टीस्पून पांढरी मिरपूड
  8. चवीपुरते मीठ
  9. २ टीस्पून साखर
  10. पाती कांदा, फक्त हिरवा भाग सजावटीसाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    स्वीट कॉर्न प्रेशर कुकरमध्ये ४ शिट्ट्या करून शिजवून घ्या.
    २ पैकी दीड वाट्या स्वीट कॉर्न मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. बारीक भोकाच्या चाळणीवर गाळून घ्या.

  2. 2

    कढई गरम करून त्यात बटर घालावे. भोपळी मिरची, गाजर, कोबी घालून मिनिटभर परतावे. आता गळलेली प्युरी आणि उरलेले १/२ कप अख्खे दाणे घालावे. तसेच साधारण अडीच पाणी घाला.

  3. 3

    लहान वाटीत कॉर्न फ्लोअर आणि १/२ कप पाणी घालून मिश्रण तयार करावे. सूपला उकळी आली की त्यात दाटसरपणासाठी कॉर्न फ्लोअरचे मिश्रण घालावे.

  4. 4

    मीठ, साखर आणि मिरपूड घालावी. मध्यम आचेवर मिनिटभर उकळी काढावी.
    सूप सर्व्हिंग बोलमध्ये वाढावे. कांद्याची पात बारीक चिरून सजवावे. गरमच सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Durga Uday Popat Thakkar
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes