भगरीचा साबुदाणा वडा (bhagricha sabudana vada recipe in marathi)

Mangal Phanase
Mangal Phanase @cook_19337533

# उपवास

भगरीचा साबुदाणा वडा (bhagricha sabudana vada recipe in marathi)

# उपवास

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 वाटीवाटी भगर
  2. 1/2 वाटीसाबुदाणा
  3. 8हिरव्या मिरच्या
  4. चवीनुसार मीठ
  5. 3 कपशेंगदाणा तेल
  6. 1 वाटीशेंगदाणे
  7. 1मोठा बटाटा

कुकिंग सूचना

  1. 1
  2. 2

    वडा- प्रथम भगर व साबुदाणा थोडे पाणी टाकून तीस मिनिटे चांगले भिजवावे. त्यानंतर भगर घट्टसर बारीक वाटून घ्यावी. त्यात थोडे चवीपुरते मीठ टाकावे व बाजूला ठेवावे.

  3. 3

    एक बटाटे उकडून घ्यावे.अर्धी वाटी शेंगदाणे व पाच मिरच्या बारीक वाटाव्या.

  4. 4

    मऊ भिजलेला साबुदाणा,उकडलेले बटाटे व वाटन यात चवीनुसार मीठ टाकून हे घटक चांगले एकत्र मिसळून घ्यावे. त्याचे गोल चपटे असे वडे वळवावे.

  5. 5

    ते वडे त्या भगरीच्या पिठात बुडवून तळून घ्यावे.तळताना गॅस अधिक कमी असावा.दोन्ही बाजू चांगल्या तळून घ्याव्या.

  6. 6

    शेंगदाण्याची आमटी- प्रथम अर्धी वाटी शेंगदाणे,तीन हिरव्या मिरच्या,चवीनुसार मीठ यात थोडे पाणी टाकून बारीक वाटण करावे.कढईत तेल टाकून त्यात वाटण टाकावे व उकळून घ्यावे.

  7. 7

    आता तुम्ही गरमागरम वडे शेंगदाण्याच्या आमटी सोबत खाऊ शकता.या पदार्थाला थोडा वेळ लागतो परंतु चवीला तो तितकाच छान लागतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mangal Phanase
Mangal Phanase @cook_19337533
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes