संक्रांती_स्पेशल_तिळगुळ_पोळी

Pranita Kulkarni
Pranita Kulkarni @cook_19254299

हि पारंपरिक रेसिपी आहे. मी माझ्या आईकडून शिकली आहे.

संक्रांती_स्पेशल_तिळगुळ_पोळी

हि पारंपरिक रेसिपी आहे. मी माझ्या आईकडून शिकली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. सारणासाठी लागणारे साहित्य
  2. 1 वाटी तीळ
  3. 1\4 वाटी भाजलेले शेंगदाणे
  4. 2 वाटी गुळ
  5. 2 चमचेभाजलेले बेसन
  6. 1 चमचावेलची पूड
  7. पारीसाठी साहित्य
  8. 2 वाटी गव्हाचे पीठ
  9. पाव चमचा मीठ
  10. 3 चमचेतेल अथवा तूप मोहन म्हणून
  11. पोळी भाजून घेण्यासाठी साजूक तूप

कुकिंग सूचना

  1. 1

    तिळ हलक्या सोनेरी रंगावर भाजून घ्यावे

  2. 2

    मिक्सारच्या भांड्यात तिळ,शेंगदाणे,बेसन वेलची पूड, गुळ टाकून जाडसर करून घ्यावे.

  3. 3

    पारीसाठी गव्हाच्या पिठात मीठ तेल टाकून कणीक भिजवून घ्यावी. नेहमीच्या पोलीसाठी जशी भिजवतो तशी भिजवून घ्यावी व 5 मिनिट झाकून ठेवावी.

  4. 4

    5 मिनिटांनी कणिक मळून घ्यावी व छोटे गोळे करून घ्यावेत. सारणाचे हलक्या हाताने लाडू करावे.आता कणिक गोळा घेऊन त्यात सारण भरून घावे.

  5. 5

    हलक्या हाताने पोळी लाटून घ्यावी व तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप लावून खरपूस भाजून घ्यावी.

  6. 6

    पोळी आता तयार झाली आहे.तुपाबरोबर वाढावी. खमंग खुसखुशीत रुचकर तिळगुळ पोळी खूपच छान लागते.

  7. 7

    हि पोळी एकदा करून ठेवली की 4 ते 5 दिवस सहज टिकते. सारण सुध्दा महिनाभर महिनाभर टिकते. आपण केव्हाही पटकन पोळी करू शकतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pranita Kulkarni
Pranita Kulkarni @cook_19254299
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes