गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649

#GR2
गावरान रेसिपी

गुळपोळी (Gulpoli Recipe In Marathi)

#GR2
गावरान रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
८ जण
  1. सारणासाठी :
  2. 1 कपसाधे तीळ (विना पॉलिश)
  3. 1/2 कपसुकं खोबरं
  4. 3/4 कपशेंगदाणे
  5. 1/4 कपबेसन
  6. 1 कपगुळ पावडर
  7. 1/2 कपसाधा गुळ
  8. वेलची जायफळ पूड
  9. पारीसाठी :
  10. 2 कपगव्हाचे पीठ
  11. 2 टेबलस्पूनगरम तेल
  12. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    सारण बनविण्यासाठी :
    तीळ, किसलेलं सुकं खोबरं वेगवेगळे थोडे भाजून घ्या. नंतर शेंगदाणे भाजून घ्या. त्यानंतर बेसन कोरडच भाजून घ्या.

  2. 2

    मिक्सरमध्ये प्रथम सालीसहित शेंगदाणे भरड काढा (पल्स मोडवर फिरवा) मग त्यातच भाजलेले तीळ व सुकं खोबरं घाला. व एकदाच पल्स मोडवर फिरवा.

  3. 3

    भांड्यात अर्ध सारण काढून घ्या व त्यातच गुळ पावडर व साधा गुळ अर्धा, वेलची जायफळ पूड घालून पल्स मोडवर तीन वेळा फिरवा. एका भांड्यात काढा. आता जे दुसऱ्या भांड्यात अर्ध सारण होतं ते घाला व राहिलेला गुळ घालून वरीलप्रमाणेच फिरवा. सर्व एकत्र करून घ्या. गुळ गोडीला कमी वाटल्यास चव घेऊन हवा असल्यास घालावा.
    हे झालं सारण तयार.

  4. 4

    पारीसाठी : गव्हाच्या पिठात गरम तेल व मीठ घालून एकजीव करा नंतर हवे तेवढे पाणी घालून घट्ट मळा. वरून तेल लावून अर्धा तास झाकून ठेवा.

  5. 5

    पीठ चांगले मळून गोळे बनवा. गोळ्याची पारी बनवून त्यात वरील सारण भरून पारी बंद करा. सुकं पीठ लावून अलगद हाताने पसरून घ्या मग अलगद लाटून घ्या. तव्यावर पोळी वरून तूप टाकून खरपूस भाजा. ही झाली गुळपोळी तयार. या पोळ्या प्रवासात न्यायला ही चांगल्या. अगदी १०-१५ दिवस टिकतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
रोजी

Similar Recipes