मेथीच्या दाण्याचे लाडू (methidanyache ladoo recipe in marathi)

Shubhangi Dudhal-Pharande
Shubhangi Dudhal-Pharande @cook_26200113

#GA4 #Week2
बराच वेळा बाळंतपणानंतर खायला दिला जाणारा हा एकदम पौष्टिक पदार्थ आहे.लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याला एकदम उपयुक्त असणारा हा लाडू मी माझ्या आईकडून बनवायला शिकले. हे लाडू सांधे दुखी,कंबर दुखी, वाता सारख्या दुखण्यावर रामबाण इलाज आहेत.

मेथीच्या दाण्याचे लाडू (methidanyache ladoo recipe in marathi)

#GA4 #Week2
बराच वेळा बाळंतपणानंतर खायला दिला जाणारा हा एकदम पौष्टिक पदार्थ आहे.लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या आरोग्याला एकदम उपयुक्त असणारा हा लाडू मी माझ्या आईकडून बनवायला शिकले. हे लाडू सांधे दुखी,कंबर दुखी, वाता सारख्या दुखण्यावर रामबाण इलाज आहेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 लोक
  1. 3/4 कपमेथीचे दाणे
  2. 1 कपगव्हाचे पीठ
  3. 1 कपदुध
  4. 3/4 कपबदाम
  5. 1/2 कपडिंक
  6. 2 कपगुळ
  7. 1 कपतूप
  8. 1 टेबलस्पून सुंठ
  9. 1 टेबलस्पून वेलची पूड

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम मेथीचे दाणे मिक्सर मधून फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्यावी व ती पावडर दुधात भिजवून एक रात्रभर ठेवावे दुधात भिजवलेल्या मुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो

  2. 2

    दुसऱ्या दिवशी पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये भिजवलेले मेथीच्या दाण्याची मिश्रण टाकावे व ते चांगले परतून घ्यावे

  3. 3

    परतलेले मिश्रण एका ताटात काढून ठेवावे व पॅनमध्ये तूप टाकून डिंक तळुन घ्यावा तळलेला डिंक खरपूस होईपर्यंत तळावा थंड झाल्यावर डिंकाची पावडर करून घ्यावी

  4. 4

    डिंक तळून उरलेल्या तूपात गव्हाचे पीठ घालावे व गव्हाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यावे परतलेल्या मिश्रणात मेथीचे मिश्रण व डिंक घालावा

  5. 5

    मिश्रण चांगलं एकजीव करावं व एका ताटात काढावे. पॅनमध्ये गूळ टाकून तो पातळ करून घ्यावा व वरील मिश्रणात टाकून वेलची पूड मिक्स करावी

  6. 6

    मिश्रण थोडे गरम आहे तोपर्यंतच बारीक बारीक लाडू बांधावेत

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shubhangi Dudhal-Pharande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes