पनीर_पसंदा 🧀👩🏻‍🍳

Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115

#goldenapron3 पनीर हा असा घटक आहे जो दुधापासून तयार करण्यात आलेल्या प्रक्रियेमुळे तयार होतो....पनीर बहुतांश लोकांना प्रिय आहे...कारण व्हेज लोकांसाठी पनीर शिवाय पर्याय नसतोच....त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पनीर याला पसंदी आहे....पनीर बनविण्याच्या भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत...त्यातलीच माझी पनीर पसंदा ही रेसिपी👩🏻‍🍳

पनीर_पसंदा 🧀👩🏻‍🍳

#goldenapron3 पनीर हा असा घटक आहे जो दुधापासून तयार करण्यात आलेल्या प्रक्रियेमुळे तयार होतो....पनीर बहुतांश लोकांना प्रिय आहे...कारण व्हेज लोकांसाठी पनीर शिवाय पर्याय नसतोच....त्यामुळे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत पनीर याला पसंदी आहे....पनीर बनविण्याच्या भरपूर वेगवेगळ्या पद्धती आहेत...त्यातलीच माझी पनीर पसंदा ही रेसिपी👩🏻‍🍳

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. Stuffing साठी👇🏼
  2. १०० ग्रॅम पनीर किस
  3. २५ ग्रॅम काजू+मनुके काप
  4. १/२ टीस्पून सफेद तीळ
  5. 1बाऊल कोथिंबीर
  6. २ टीस्पून हिरवी चटणी
  7. ३ टीस्पून कॉर्नफ्लॉवर पीठ
  8. गरजेनुसार पाणी
  9. ग्रेव्ही साठी 👇🏼
  10. ५०० ग्रॅम पनीर
  11. मोठा कांदा प्युरी
  12. मोठा टोमॅटो प्यूरी
  13. ७-८ काजू प्युरी
  14. १ टीस्पून आलें लसूण पेस्ट
  15. १ टीस्पून धना पावडर
  16. १/२ टीस्पून जिरं पावडर
  17. १/२ टीस्पून मसाला पावडर
  18. हिरवी वेलची,
  19. लवंग,
  20. दालचिनी,
  21. अर्धा टीस्पून शहा जिरे
  22. १ टीस्पून मेथी
  23. २ टीस्पून फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय
  24. १ टीस्पून किचन किंग मसाला
  25. १/२ टीस्पून हळद
  26. १ टीस्पून लाल मिरची पावडर
  27. १ टीस्पून काश्मिरी मिरची पावडर
  28. किचन किंग मसाला (ऑप्शन)
  29. चवीनुसार मीठ
  30. तळण्यापुरते आवश्यक तेल
  31. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    पहिले स्टफ्फिंग साठी, थोडे पनीर किसणीवर किसून घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, सफेद तीळ, काजू आणि मनुके बारीक चिरून घ्या, हिरवी चटणी म्हणजेच, (पुदिना+ कोथिंबीर+आले+लसूण+हिरवी मिरची+मीठ यांचे वाटणं) आता हे सर्व मिश्रण एकत्र तयार करून सारण तयार करा (पाणी घालू नये)

  2. 2

    सर्व सारण तयार झाल्यावर, मोठे पनीरचे तुमच्या आवडीनुसार चौकोनी कुटुंब नवा त्रिकोणी आकाराचे पनीरचे भाग करा....आणि त्यात सारण भरण्यासाठी पॉकेट सारखे सुरीने मधोमध भाग करा...(फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे)💯👍🏼

  3. 3

    पनीर पॉकेट मध्ये सारण अश्या पद्धतीने भरून घ्या.💯👍🏼

  4. 4

    आता एका बाऊल मध्ये, कॉर्नफ्लॉवर पीठ घेऊन त्यात गरजेप्रमाणे पाणी घालून हे मिश्रण चारही दिशेने पिठात घोळवून घ्या आणि तेलात डीप फ्राय करून घ्या किंवा सँडविच मेकर ने ग्रील करा....मी दोन्ही पद्धत वापरून केले आहे (फोटोमध्ये दाखविल्याप्रमाणे) आता हे सर्व एका प्लेटमध्ये साइडला ठेवून द्या💯👍🏼

  5. 5

    आता, कढईमध्ये गरजेप्रमाणे तेल घेऊन त्यात अर्धा टी स्पून शहाजिरे, दोन लवंग, एक दालचिनी तुकडा, तेलात परतून घ्या मग त्यात लगेचच, एक मोठ्या कांद्याची प्युरी घाला...मग टोमॅटो प्युरी घाला....आणि पूर्ण कच्चा वास जाईपर्यंत तेल सुटेपर्यंत परतून घ्या..

  6. 6

    त्यात आता हिरवी बनविलेली चटणी एक छोटा चमचा टाका.... मग त्यात ७-८ काजूची प्युरी घाला..(मी काजूची मऊसूत वाटून केलेली पूड घातली आहे) आता छान तेल सुटेपर्यंत फ्राय करा...मग त्यात कसुरी मेथी हातानेच चोळून टाका...(वास आणि चव टिकण्यासाठी), जर तुमचे पनीर मध्ये भरावयाचे सारण शिल्लक राहिले असेल तर ते सुद्धा त्यात घालून परतून काढा....आता त्यात अर्धा टी स्पून जिर पावडर, एक टी स्पून धना पावडर, एक टी स्पून काश्मिरी मिरची पावडर, अर्धा टी स्पून गरम मसाला पावडर एक टी स्पून किचन किंग मसाला पावडर (ऑप्शन आहे)

  7. 7

    त्यातच अर्धा टी स्पून हळद, आणि चवीनुसार मिठ घालून वरून फ्रेश क्रीम किंवा दुधाची साय टाका...आणि अर्धा कप कोमट पाणी घालून ग्रेव्ही मध्यम प्रकारची तयार करा सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून ग्रेव्ही आणि पनीर ठेवून आकर्षक सजावट करून...तंदुरी रोटी.... गारलिक नान... लच्छा पराठा... पोळी (चपाती).... जीरा राईस सोबत सर्व्ह करा...💯👩🏻‍🍳💯 आपलाच आवडता #पनीर_पसंदा🧀👩🏻‍🍳🧀

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes