रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 200 ग्रॅमबेसन
  2. 200 ग्रॅमतूप
  3. 100 ग्रॅमतेल
  4. 200 ग्रॅमसाखर
  5. 1/2 कपपाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका पातेल्यात तेल व तूप दोन्ही एकत्र करून गरम करावे

  2. 2

    नंतर कढईत साखरेचा पाक करण्यासाठी ठेवावे पाक एक तारी करावा

  3. 3

    पाक तयार झाला कीत्यामधे बेसनपीठ घालून हलवून घ्यावे (टीप= बेसनपीठ पाकामधे मिक्स करताना त्यामधे गुठळ्या होवू नयेत ह्याची काळजी घ्यावी)

  4. 4

    पाकामधे बेसनपीठ छान मिक्स झाले की गरम केलेले तूप पळीने थोडे थोडे करून बेसनपीठात घालावे व चमचाने सतत हलव रहावे (टीप=तूप जेव्हा बेसनपीठात घालतो तेव्हा गरम असावे,त्यासाठी एका गॅसवर बेसन परतून घेत असताना दूसर्या गॅस वर तूप गरम करायला ठेवावे)

  5. 5

    असेच दोन दोन मिनिटांनी तूप बेसनपीठात घालून परतत रहावे पीठ परतत असताना पीठ खाली लागू नये ह्याची काळजी घ्यावी

  6. 6

    बेसनपीठ भाजून झाले की गॅस बंद करावा व एका ताटाला तूप लावून घ्यावे व भाजलेले बेसनपीठ ताटात ओतून एक सारखे करून त्याचा आपल्याला हव्या त्या साईजचे चौकोनी कापून घ्यावे व 2तास थंड करून घ्यावे

  7. 7

    2 तासाने थंड झाल्यावर मस्त छान चौकोनी आकाराचे मैसूरपाक तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini's Recipe marathi
Rohini's Recipe marathi @cook_20091722
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes