पुरणपोळी

Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
Chinchawad pune

#पुरणपोळी मराठी आपली संस्कृती मराठी आपला बाणा पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीची

पुरणपोळी

#पुरणपोळी मराठी आपली संस्कृती मराठी आपला बाणा पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीची

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिट
  1. २ वाटी गहू पीठ
  2. पीठ मळण्यासाठी पाणी गरजेनुसार
  3. १/२ टीस्पून हळद
  4. १/२ टीस्पून मीठ
  5. १ टीस्पून तेल
  6. २ वाटी चणाडाळ
  7. पाव किलो ला थोडासा कमी गुळ
  8. १ टीस्पून वेलची बडीशेप साखर याची पावडर
  9. १/२ टीस्पून तेल
  10. ६/७ टीस्पून तूप

कुकिंग सूचना

४५ मिनिट
  1. 1

    चना डाळ स्वच्छ धुऊन पंधरा मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवावी कुकर मध्ये चणा डाळी मध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालून मीठ व तेल घालून कुकर मध्ये शिजवून घ्यायची आहे सात ते आठ शिट्ट्या करून घ्यायचे आहेत कुकर थंड झाल्यावर डाळीचा टोप बाहेर काढून डाळीमधले पाणी चाळणी मध्ये गाळून वेगळे करायचे आहे

  2. 2

    डाळीमध्ये गूळ टाकून चांगलं एकजीव होईपर्यंत गॅस वर मिक्स करून घ्यायचे आहे डाळ कोरडी झाल्यावर पूरन चाळीमध्ये घेऊन डाळ काढून घ्यायची आहे

  3. 3

    आपण वाटलेली वेलची बडीशेप साखर पावडर आता पूर्ण वर टाकून पुरण हाताने चाळणीतून बारीक करून घ्यायचे आहे पुरण जास्त गरम असेल तर वाटीचा वापर करायचा आहे

  4. 4

    ताटात चवीनुसार मीठ व हळद घेऊन गहू पीठ चाळून घ्यायचे आहे आवश्यकतेनुसार पाणी टाकून पीठ मळून घ्यायचा आहे पीठ एकदम सेल मळायचे आहे पीठ मळून झाल्यावर तेलाचा हात लावून दहा ते पंधरा मिनिटं बाजूला ठेवायचा आहे

  5. 5

    पिठाच्या लाट्या करून आत मधे तूप लावून घ्या आणि आता गोल लाटी करून घेऊ

  6. 6

    लाटेमध्ये पुरण भरून लाटी बंद करून घे व्यवस्थित पीठाचा हात लावून गोलसर अलगद हाताने पोळी लाटून घेऊया

  7. 7

    गॅसवर तवा गरम करण्यास ठेवावा लाटलेली पोळी त्यावर टाकून तूप सोडावे सर्व बाजूने मध्यम आचेवर खरपूस भाजून घ्यावी पोळी भाजून झाल्यावर दोन्ही बाजूने तूप सोडावे आपली टम फुगलेली पुरणपोळी तयार

  8. 8

    दुधाबरोबर आणि तुपासोबत पुरणपोळी खावी रंगपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anita sanjay bhawari
Anita sanjay bhawari @cook_19997427
रोजी
Chinchawad pune

Similar Recipes