केळोरी

राजेळी केळी वापरून हा पदार्थ बनवला जातो, पण हल्ली मद्रासी केळीच मिळतात. मी मात्र दारच्या बिनबोंडाच्या केळ्यांचा वापर केलाय. कीवर्ड- कोकोनट
#goldenapron3
केळोरी
राजेळी केळी वापरून हा पदार्थ बनवला जातो, पण हल्ली मद्रासी केळीच मिळतात. मी मात्र दारच्या बिनबोंडाच्या केळ्यांचा वापर केलाय. कीवर्ड- कोकोनट
#goldenapron3
कुकिंग सूचना
- 1
केळे सोलून त्याचे १-१|| इंच जाडीचे काप करावेत. प्रत्येक कापाला भरल्या वांग्यांसाठी करतो, तशी उभी-आडवी चीर द्यावी, (+) म्हणजे त्यात सारण भरता येईल. केळ्यात तयार सारण भरावे. मी सारण तयार होते म्हणून घेतले. त्याऐवजी १ कप ओल्या नारळाचा चव, अर्धा कप गूळ किसून, पाव चमचा वेलचीपूड, आवडीप्रमाणे सुक्या मेव्याची भरड पूड किंवा काप घेऊन एकत्र करून सारण तयार करावे.)
- 2
फ्राय पॅन किंवा पसरट भांड्यात साजूक तूप तापवून त्यात तयार केळी रचून ठेवावी. उरलेले सारण केळ्यांच्या आजूबाजूस पसरावे. वरून झाकण ठेवून केळी चांगली शिजवून घ्यावी
- 3
मधून मधून झाकण काढून केळी फिरवून घ्यावी. सारणात गूळ असल्याने, भांड्याला खाली लागण्याची शक्यता असते. थंड झाल्यावर खायला द्यावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
भरली केळी (bharli keli recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी, केळी अनेक प्रकारची असतात. केळ हे पूर्णान्न आहे. मी आज 'सफेद वेलची 'केळी भरून ही रेसिपी केली आहे. आमच्या इथे ही केळी जास्त खातात. मी ही रेसिपी खाण्यासाठी केली आहे तुम्ही त्यात उपासाचे पदार्थ घालून उपाससाठी अशी भरली केळी करू शकता. Shama Mangale -
बनाना हलवा लाडू (banana halwa ladoo recipe in marathi)
#लाडूकेरळ आणि केरळ भागात केळाचे अनेक पदार्थ बनवले जातात जसे की केळाचे चिप्स,केळाची भाजी,केळाचे गोड काप,भरली केळी इ.केळाचा हलवा हा पदार्थ ही प्रसिद्ध आहे पण तो वड्या पाडून केला जातो. हा हलवा थोड्या वस्तू वापरून बनवला जातो. पण यात मी साखर न वापरता गुळ वापरला आहे तर काजू तळलेले न घालता रोस्टेड वापरले आहेत. दूध पावडर वापरली जात नाही पण मी वापरली आहे. Supriya Devkar -
केळ्याचा हलवा (kelicha halwa recipe in marathi)
#GA4 #Week6 की वर्ड-- हलवाकेळ्याचा हलवा.. हलवा म्हटलं की मेंदूला गोड चवीचेच signals मिळतात..इतकं या हलव्याचं गोडाशी घट्ट नातं आहे..अगदी अंगुळीभर पुरुन उरेल एवढं नातं..असं या हलव्याच्या आणि गोडाच्या नात्याचं गणित आहे..हलवा मग तो कुठलाही असो तो गोडच असतो ..हे प्रमेय सिद्ध करण्यासाठी फार मोठ्या सिद्धतेची गरज नसतेच मुळी..अगदी २-३ पायर्यामध्ये आपण सिद्ध करु शकतो..इतकं सोपं गणित आणि इतका सोपा हलवा..काही पूर्वतयारी नको..अगदी नवपरिणीत वधू देखील याचाच आधार घेत सगळ्यांची मनं जिंकते..म्हणतात ना हृदय जिंकण्याचा मार्ग पोटातूनच जातो..हो पण तो मुगाचा हलवा थोडा द्वाडच बरंका..हाती लागतात लागत नाही लवकर.. खूप दमछाक करायला लावतो..पण एकदा का हाती आला की त्याच्या वासाने, चवीने आपले श्रम कुठल्याकुठे पळून जातात..तसाच दुसरा फिल्मी हलवा म्हणजे गाजर का हलवा...बॉलिवूडच्या मॉं ना मुंह मीठा करण्यासाठी फक्त तोच हलवा करता येतो आणि अख्ख्या जगात तोच तो काय गोड पदार्थ आहे असे वाटू लागते..😂..दुधी हलवा ..त्यांची पण मजाच.. किसताना पाण्यात ठेवलात तरच तो तुमचं ऐकणार नाहीतर सरळ तोंड काळं करुन टाकतो हो स्वतःचं..बिचारी ती सुगरण..डोक्याला हात लावून बसते...सुजी का हलवा म्हणजे आपला शिरा हो साजूक तुपातला ..अगदी गुणी ,शांत ,संयमी..त्रास देतच नाही..त्यामानाने आटे का हलवा.. जरा बडं प्रस्थ..तो पण लवकर प्रसन्न होत नाही आपल्यावर..वेळ घेतोच तो पण..पण प्रसन्न झाल्यावरचा खमंग दरवळ मोहून टाकतो..असे हे हलव्यांचे थोडेसे नखरे.. पण यापैकी मी तर कुठलाच हलवा न करता झटपट केळ्याचा हलवा केलाय..कमी श्रमात,कमी साहित्यात तीच पण जास्त खमंग चव..चला तर मग आपण हलव्याचं प्रमेय सिद्ध करायला घेऊ या.. Bhagyashree Lele -
केळ्याची तवसळी
#रवाम्हटलं तर तशी ही पारंपारिक पाककृती आहे. केळी जास्त झाली आणि पिकली की दुपारच्या खाण्यासाठी ही तवसळी बनवली जायची. चला तर बनवूया घरातील सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून ही केळ्याची तवसळी. Darpana Bhatte -
गोडाची पानगी (godachi pangi recipe in marathi)
#मराठी_राजभाषा_दिन_रेसिपी आज मराठी राजभाषा दिन मराठी भाषा गौरव दिन म्हणजेच कुसुमाग्रज उर्फ वि वा शिरवाडकर यांचा जन्मदिवस तात्यासाहेबांनी आयुष्यभर मराठी भाषेला राजभाषा ज्ञानभाषा अभिजात दर्जा मिळावा जावा यासाठी स्पष्ट केले आणि आपल्या साहित्यातून त्यांनी तशी सरकारी दरबारी मागणी केली मंत्रालयाच्या दरबारात दरबारात मराठी भाषा लक्तरं नेसून उभी आहेत असते म्हण नात माझ्या मराठी मातीला नका म्हणू हीन दीन .. स्वर्गलोकाहू थोर मला हिचे महिमान.. एवढी कळकळ एवढा जाज्वल्य अभिमान त्यांना मराठी भाषेबद्दल होता.. म्हणून त्यासाठी ते अहोरात्र झटले आजच्या दिनाचे औचित्य साधून मराठी मातीतला पारंपारिक पदार्थ गोडाची पानगी जो खास कोकणातील आहे तो आज आपण करूया .पानगी हा न्याहारीचा पदार्थ आहे. पानगी मुख्यतः तांदळाच्या पिठापासून बनवतात पण काही वेळेस बेसनाचे पीठ ज्वारीचे पीठ, तांदळाचे पीठ एकत्र करून देखील बनवतात. तिखटाची पण पानगी बनवली जाते, गुजरात मध्ये याला पानकी म्हणतात. ही पानगी केळीच्या पानावर शिजवली जाते तर पातोळ्या हा पदार्थ हळदीच्या पानावर वाफवला जातो.. मोदकाप्रमाणे आणि यामध्ये गुळ खोबऱ्याचे सारण असते . गौरीच्या नैवेद्याला पातोळ्याचा नैवेद्य दाखवला जातो. अतिशय सोपी झटपटीत आणि पौष्टिक अशी ही पाककृती आज आपण करूया. आज मी ही गोडाची पानगी करताना त्यामध्ये गुळाचा वापर करत आहे पण तुम्हाला हवे असल्यास तुम्ही साखर देखील वापरू शकता. चला तर मग जाऊया पाककृती कडे.. Bhagyashree Lele -
पिकलेल्या केळ्याचे सांदण (Ripe Banana Sandan Recipe In Marathi)
सोपी आणि कमी वेळात होणारी रेसिपी आहे ... तसेच जास्त पिकलेली किंवा थोडी काळी पडलेली केळी फेकतो , ती न फेकता त्याचा असा वापर करून छान गोड पदार्थ तयार होतो ... Aryashila Mhapankar -
दुधी भोपळ्याचा हलवा (dudhi bhopdyacha halwa recipe in marathi)
#GA4 #week21पझल मधील दुधी भोपळा. आज मी हलवा बनवला. Sujata Gengaje -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
#cooksnap-हा शिरा नैवेद्यासाठी नेहमी केला जातो, तेव्हाच या शिर्याला अप्रतिम चव येते.सर्वाना आवडणारा....ही रेसिपी मी शोभाताई देशमुख यांची कुकस्नॅप केली आहे, सुरेख झालेली आहे. Shital Patil -
पिकलेल्या केळीच्या पूरी (piklya kelichi puri recipe in marathi)
#G4#week2#केळी खायची म्हटलं की नाक मूरडनारया माझ्या मुला साठी केळीच्या गोड पूरया.Ashwini Choudhari
-
केळ्याचे गुलगुले (kelyache gulgule recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी#गुलगुले✍️हा गोड पदार्थ आहे. उत्तर भारतात बनवला जातो. मुस्लिम समाजातही बनवतात. फक्त गहू पीठ व गूळपाणी लागते. नैवेद्यासाठी उत्तम. Manisha Shete - Vispute -
'केला बन्स' (kela bun recipe in marathi)
#KDखूप जास्त पिकलेली केळी फार कमी लोकांना आवडतात पण असे जर बन्स केले तर मोठे/ लहान सगळयांना आवडतील .माझ्या आईची ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल, अशी माझी खात्री आहे .हा मूळचा गोवन पदार्थ आहे…. अतिशय सोप्पा आणि चविष्ट. Vinita Mulye-Athavale -
कोकोनट शिरा (coconut sheera recipe in marathi)
#GA4 #week14 #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड नारळाचे दूध शोधून काढले आणि कोकोनट शिरा बनवला.ही रेसिपी मी Tarla Dalal यांची मूळ रेसिपी, "Coconut Rava Sheera" मधून तयार करून बनविली. कोकोनट शिरा खूप स्वादिष्ट झाला. Pranjal Kotkar -
-
गहू ड्रायफ्रूट शिरा (gahu dryfruit shira recipe in marathi)
#GA4 #week9#ड्रायफ्रूट ह्या की वर्ड नुसार हा पौष्टिक शिरा बनवला आहे. आपल्याकडे बाळंतिणीसाठी खास मुद्दाम बनवला जातो. बलवर्धक आहे. Sanhita Kand -
नारळाच्या दुधातली गाजराची खीर (naradache dudhache gajrache kheer recipe in marathi)
#GA4#week14#नारळ दुधातली खीरगोल्डन एपरन चार मधील पझल क्रमांक 14 मधील कीवर्ड कोकोनट मिल्क ओळखून मी नारळाच्या दुधातली गाजराची खीर बनवली आहे. ही करायला सोपी आहे व अतिशय रुचकर लागते. Rohini Deshkar -
हलवा पुरी मोदक (halwa puri modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआजचे मोदकाचे नाव एकूण विचारात पडलात🤔😊. आजचे मोदक आपला नेहमीचा प्रसादाचा शिऱ्याचे सारण आणि घवाच्या कणकेची पारी असे तयार केले. त्यामुळे हलवा, पुरी हे नाव. 🥰🥰🙂🙂 Jyoti Kinkar -
तांदळाचे पायसम (tandalache payasam recipe in marathi)
#दूध तांदळाचा पायसम हा अनेक ठिकाणी आवडीने बनवला आणि खाल्ला जातो. दूध वापरून बनवतात व दुधामध्ये भात शिजवून हा खीर चा पदार्थ बनवतात रजनी शिगांंवकर (आईच्या रेसिपीज) -
केशर पिस्ता श्रिंखड. (kesar pista shrikhand recipe in marathi)
#gpसण म्हंटला कि काहीतरी गोडाथोडाचे पदार्थ झालेच पाहिजे. आणि तसेही गुढीपाडवा म्हंटला की श्रिंखड चे नाव ओठी येतातच..म्हणून मी देखील केशर पिस्ता श्रिंखड केलेय खास गुढीपाडव्यासाठी... 💃 💕 Vasudha Gudhe -
प्रसादाचा शिरा (prasadacha sheera recipe in marathi)
प्रसादाचा शिरा खास करून सत्यनारायणाच्या पुजेला बनवला जातो. Ranjana Balaji mali -
-
स्टफ बनाना (stuffed banana recipe in marathi)
#CookpadTurns4#कुकविथफ्रूट्सप्रथम कुकपॅडचे खूप खूप अभिनंदन व खूप साय्रा शुभेच्छा. कूकपॅड मूळे नवनवीन डीश बनवण्याची आवड निर्माण झाली म्हणजे ती होती पण प्रत्यक्ष कधी करायला जमत नसे पण आता अगदी ओढीने वेळ काढून रेसिपी बनवली जाते. त्यामुळे मी खूप खूश आहे. Jyoti Chandratre -
-
केळ्याचे बोंडे (kelyache bonda recipe in marathi)
#बोंडे #कालपासून घरात केळी होती. परंतु खाण्यात येत नव्हती. त्यातही ती काळे पडत होती...आता त्याचे काय करायचे म्हणून हा प्रकार करून पाहिला...आणि घरात सगळ्यांना आवडला...म्हणून मग ही रेसिपी....यात साखरे ऐवजी गुळाचाही वापर करू शकतो... Varsha Ingole Bele -
भरली केळी (bharli keli recipe in marathi)
#ckps#स्मिता कारखानीस##भरली केळी#हा पदार्थ खासकरून गोकुळाष्टमीच्या नैवेद्यासाठी करतात smita karkhanis -
बनाना पॅन केक (banana pan cake recipe in marathi)
#Trending_recipe😋......मुलांची आवडती डिश आहे पॅन केक, खायला मस्त फ्लेवर येतो आणि एकदम स्वाफ्ट होतात खुप खुप टेस्टी लागताततसेच बनाना बद्दल तर फायदे तोटे तर सर्वनांच माहिती आहे....पण 👉बनाना यामध्ये मॅग्नेशियम, फायबर्स खूप जास्त प्रमाणात असतात म्हणून बनाना खायला पाहीजे ना😊.कधी कधी सर्वाच्याच घरी इतर फळांबरोबर बनाना पण आणला जातो,,,,,पण मुलं इतर फळे चट करून खातात आणि बनाना खायला मुलं नाटक कंटाळा करतात, 😌 मग तशीच शिल्लक राहते,,आणि 🍌 खूप पिकल्यावर कुणी खायला तय्यार नसते मग अशा वेळी बनानाची झटकन पटकन होणारी एखादी रेसिपी करून मुलांना द्यायचीत ना😛😋 म्हणून ही बनाना पॅन केक रेसिपी मी तुमच्यासमोर सादर करत आहेत🤗खरचं सर्वाना खूप आवडतील शिवाय हे खूप पौष्टिकही आहेत🤗 चला तर पाहुयात रेसिपी👉👉👉 Jyotshna Vishal Khadatkar -
चीजी हाॅट पास्ता (cheese hot pasta recipe in marathi)
#बटरचीजहल्ली घरोघरी लहान आणि मोठ्यांचा पण आवडता पदार्थ म्हणून पास्ता बनवला जातो. खूप वेगवेगळ्या आकाराचे पास्ता मिळतात. मी मॅक्रोनी पास्ता बनवला. मस्त तिखट आणि चटपटीत असा हा हाॅट पास्ता खायला मजा आली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
रव्याचा शिरा(हलवा) (ravyacha sheera recipe in marathi)
#GA4#week6#keyword_halva Halva हा keyword वापरून मी हा पदार्थ केला आहे.कुठलाही सण असो वा गोड खाण्याची इच्छा त्यात झटपट आणि पौष्टिक तयार होणारा पदार्थ म्हणजे रव्याचा शीरा(हलवा) Shweta Khode Thengadi -
-
पिकलेल्या केळ्यांच्या पुऱ्या / घाऱ्या (ghargya recipe in marathi)
जास्त पिकलेली केळी झाली की आपण फेकून देतो. या केळयांपासून विविध पदार्थ बनवता येतात.मी आज त्यापासून पुऱ्या / घाऱ्या बनवल्या आहे. खूप छान झाल्या. तुम्ही नक्की करून बघा. प्रवासात नेण्यासाठी चांगल्या आहेत. Sujata Gengaje -
नारळी भात (Narali Bhat Recipe in Marathi)
नारळी भात - महाराष्ट्रातील लोकांमध्ये प्रसिद्ध असा गोड पदार्थ. नारळीपौर्णिमेला हा पदार्थ महाराष्ट्रातील बहुतेक घरी बनवला जातो. दिवाळीमध्ये जसा फराळ बनवला जातो अगदी त्याचप्रमाणे नारळी पौर्णिमेला नारळी भात बनवला जातो. लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वाना आवडणारा असा हा पदार्थ आहे आणि विशेष म्हणजे अगदी कमी सामानात आणि घरातील पदार्थांपासून हा नारळी भात बनवला जातो. अतिशय पारंपरिक असा हा पदार्थ आहे. नारळाचा स्वाद आणि सोबतीला सुकामेवा त्यामुळे नारळीभाताला उत्तम चव लागते. नारळी भात बनवण्यासाठी बासमती सुगंधी किंवा आंबेमोहोर तांदळाचा वापर केला जातो, त्यामुळे नारळीभाताला खूप छान सुवास येतो. Shweta's Kitchen Marathi
More Recipes
टिप्पण्या