भरली केळी (bharli keli recipe in marathi)

Prachi Ranadive
Prachi Ranadive @prats1111

#ckps भरली केळी

भरली केळी (bharli keli recipe in marathi)

#ckps भरली केळी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. राजेळी केळी
  2. १- १/२ नारळाचा चव
  3. १ - १ १/२ वाटी नारळाचे दूध
  4. १/४ किलो गूळ
  5. चिमूटभर मीठ
  6. थोडे केशर
  7. वेलची पूड
  8. २ चमचे साजूक तूप
  9. ड्रायफ्रूटस - सजावटी करता (इच्छानुसार)

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम राजेळी केळी स्वच्छ धुवून घ्यावीत

  2. 2

    एका पसरट भांड्यात २ चमचे साजूक तूप तापवून भांड्याला लावून घ्यावे.

  3. 3

    नंतर राजेळी केळीची सालं काढून ती भांड्यात लावून घ्यावी.

  4. 4

    १ नारळाचं खोबरं गूळ, वेलची पूड, मीठ, केशर एकत्र करून चव घ्यावा. १/२ नारळाचे दूध काढून घ्यावे.

  5. 5

    केळी सोलून त्याचे दोन भाग करून घ्यावेत. त्यात मध्ये चीर देऊन चव भरून घ्यावा.

  6. 6

    भरलेली केळी सुबकपणे सालींवर ठेवावीत व उरलेला चव त्यावर पसरावा.

  7. 7

    नंतर ह्या केळ्यांवर नारळाचे दूध घालून, केळी मंद आचेवर झाकण ठेऊन शिजत ठेवावीत.

  8. 8

    साधारण १/२ तासांनी नारळाचे दूध केळ्यांमध्ये मुरते व केळी तयार होतात.

  9. 9

    ही केळी छान सजवून,त्यावर ड्रायफ्रुटस घालून त्याचा नैवैद्य दाखवावा व त्याचा आनंद घ्यावा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Ranadive
Prachi Ranadive @prats1111
रोजी

Similar Recipes