कोकोनट शिरा (coconut sheera recipe in marathi)

Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

#GA4 #week14 #post2
गोल्डन एप्रन 4 -आठवडा 14 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड नारळाचे दूध शोधून काढले आणि कोकोनट शिरा बनवला.
ही रेसिपी मी Tarla Dalal यांची मूळ रेसिपी, "Coconut Rava Sheera" मधून तयार करून बनविली. कोकोनट शिरा खूप स्वादिष्ट झाला.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपकिसलेले ओले खोबरे
  2. 1/4 कपतूप
  3. 1/2 कपबारीक रवा
  4. 7-8बदामाचे तुकडे
  5. 7-8काजू चे तुकडे
  6. 1 कपनारळाचे दूध
  7. 1 कपपाणी
  8. 1/4 कपमावा
  9. 1/2 कपसाखर
  10. 1/2 टी-स्पूनवेलची पूड

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    पातेल्यात तूप गरम करून त्यात रवा भाजून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवून 5-6 मिनिटे सतत ढवळत रवा भाजून घ्या.

  2. 2

    नंतर त्यात किसलेले खोबरे, काजू-बदामाचे थोडेसे तुकडे घालून 2-3 मिनिटे परतून घ्या.

  3. 3

    साखर, नारळाचे दूध, पाणी घालून व्यवस्थित मिसळून घ्यावे. सतत ढवळत असताना, सर्व पाणी आटवून होईपर्यंत मध्यम आचेवर 10 मिनिटे sheera शिजवून घ्या.

  4. 4

    शेवटी त्यात वेलची पूड आणि मावा घालून एकत्र मिसळून घ्या. गॅस मध्यम आचेवर ठेवून 2 मिनिटे सतत ढवळत रहा. वरून काजू-बदामाचे उरलेले तुकडे घालून गार्निशिन करा.

  5. 5

    नंतर गॅस बंद करून कोकोनट शिरा गरमागरम सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pranjal Kotkar
Pranjal Kotkar @PUK260176
रोजी
19/4 Sagar sannidhaya Rahiwasi Chawl, Mahim Causeway, Mum-16.

Similar Recipes