कुकिंग सूचना
- 1
प्रथम फ्लॉवर व बटाटाचे मोठे- मोठे तुकडे करून मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यावेत आणि कुकर मध्ये 6-7 शिट्या करून शिजवून घ्यावे.
- 2
मिश्रण एकजीव झाल्यावर 15 मिनिटे झाकून ठेवावे. एका बाजूला कढईत 2 वाटी पाणी घेऊन त्यात लिंबाची फोड/ चिंच टाका. पाणी गरम झाल्यावर गॅस बारीक करा.
- 3
मिक्सरच्या भांड्यात टोमॅटो व बीटाचे तुकडे करून थोडे पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यावी. फ्लॉवर व बटाटे मॅश करून घ्यावे.
- 4
ढोकळ्याच्या मिश्रणात ENO घालून एकाच दिशेने चांगले फेटून घ्या. एका खोलगट प्लेटला तेल लावून त्यावर हे मिश्रण ओतावे आणि कढईत ठेवून त्यावर झाकण ठेवा. त्या झाकणावर काहीतरी जड ठेवावे म्हणजे वाफ बाहेर येणार नाही.
- 5
10-12 मिनिटे मंद आचेवर ठेवावे. दुसरीकडे फोडणीसाठी पॅन ठेवून त्यात तेल टाकून तेल गरम झाले की त्यात मोहरी टाकावी मोहरी तडकल्यावर त्यात मिरची, कढीपत्ता, तीळ घालून परतून घ्यावे नंतर त्यात साखर व पाणी घालुन फोडणी 1 मिनिटे ढवळावी व फोडणी गरम ढोकळ्यावर घालावी. आणि ढोकळा सर्व्ह करावा.
- 6
कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यावे रंग बदलत आल्यावर त्यात मीठ व सिमला मिरची घालून मंद आचेवर परतून घ्यावे. चांगले परतले गेल्यावर त्यात लाल तिखट, हळद, पावभाजी मसाला घालून परतून त्यात टोमॅटो - बीट ची पेस्ट व वाटीभर गरम पाणी घालून परतून घ्यावे.
- 7
भाजीला तेल सुटायला लागल्यावर त्यात फ्लॉवर- बटाट्याचे मिश्रण व आवश्यकतेनुसार गरम पाणी घालून मिश्रण एकजीव करावे. साजूक तूप व कोथिंबीर घालून 4-5 मिनिटे मंद आचेवर ठेवावे अधून मधून हलवत राहावे. आणि गरमागरम भाजी भाजलेल्या पावासोवत सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पावभाजी
#स्नॅक्स#पावभाजीअहाहा! नुसत्या नावानेच मन प्रसन्न होतं. घरात सर्वांना आवडतेच आणि गृहिणीला ही खास आवडते कारण ह्या भाजीत कोणतीही भाजी बेमालूम मिसळून त्यातली पौष्टिक तत्त्व सुध्दा सांभाळता येतात.बाहेरची पावभाजी सर्वांनाच आवडते, पण त्यात आरोग्याला हानिकारक रंग मिसळलेले असतात. आज आपण आकर्षक पण कृत्रिम रंग अजिबात न मिसळता पावभाजी कशी करायची ते पाहू. Rohini Kelapure -
मुंबईची पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड ऑफ महाराष्ट्र#मुंबईची पावभाजीआपल्या खाद्यसंस्कृतीत असे अनेक पदार्थ आहेत की.... ज्यांना खूप महत्त्वाचे स्थान आहे तसाच एक पदार्थ म्हणजे... मुंबईची चौपाटीवर मिळणारी पावभाजी... बाहेरचा व्यक्ती मुंबईत आला की.... पावभाजीचा आनंद घेतो... तेच काय तर पावभाजी मसाला वर सुद्धा... मुंबई स्पेशल पाव भाजी मसाला असं लिहिलं असतं...इतकी खास आहे मुंबईची पावभाजी रेसिपी..... Shweta Khode Thengadi -
पावभाजी पुलाव (pavbhaji pulav recipe in marathi)
घराघरात होणारी पौष्टिक पावभाजी सगळ्यांची आवडती झाली आहे. घरच्या पार्टीत खास स्थान मिळाले आहे. Manisha Shete - Vispute -
-
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
#SDR पावभाजी हि बनवायला थोडी वेळखाऊ असली तरी संपते मात्र लवकर. स्ट्रिटफूड असणारी पावभाजी घराघरात बनवली जाते. Supriya Devkar -
खडा पावभाजी (Khada Pav Bhaji Recipe In Marathi)
#CookpadTurns6ग्रुपमध्ये गोड खूप शेअर झालं म्हणून तिखट काहीतरी खास कुकपॅड साठी चटकदार चमचमीत टेस्टी पावभाजी Charusheela Prabhu -
-
पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
पावभाजी पूर्वी कामगारांची पोटं भरावीत म्हणून त्यांना देण्यासाठीचा पदार्थ होता. हीच आता सगळ्यांच्या घरची मेजवानीची डिश झाली आहे. Pragati Pathak -
स्ट्रीट स्टाईल पावभाजी (Street style pavbhaji recipe in marathi)
#SFRपाव भाजी हा एक भारतीय लोकप्रिय फास्ट फूड आहे. मसालेदार भाजी (ग्रेव्हीसह) बनून पाव सोबत सर्व्ह केला जातो.वस्त्रोद्योग कामगारांसाठी हलका पदार्थ आणि जलद जेवणाचा पर्याय म्हणून मुंबईत उगम पावलेले हे मुंबईतील सर्वात प्रतिष्ठित स्ट्रीट फूड म्हणून संपूर्ण भारतात प्रचंड लोकप्रिय झाले.पाव भाजी आता simple hand crafts ते भारत आणि परदेशात औपचारिक रेस्टॉरंटपर्यंत, हॉटेल्स सर्व ठिकाणी प्रसिद्ध आहे. आपणास हे अगदी वरच्या बाजूस असलेल्या रेस्टॉरंट्सपासून ते शाळा / महाविद्यालयीन कॅन्टीनपर्यंत आणि रस्त्यावरील गाड्यां परेंत सगळी कडे आढळेल.होममेड व्हर्जन तुम्हाला वाटतं त्यापेक्षा खूप सोपं आहे. या पाव भाजीची चव तुम्हाला मुंबईतील पाव भाजी ची आठवण आणून देईल. रेसिपीच्या तयारीशिवाय, तुम्हाला जास्त काही दुसरा प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. हे सर्वाना आवडते असले तरी जेवणासाठी हे उत्तम आहे. पाहूयात होम मेड पावभाजी ची रेसिपी. Deepti Padiyar -
पावभाजी (pavbhaji recipe in marathi)
#स्नॅक्स7. रविवार- पावभाजीआज मी जैन पावभाजी बनवली आहे. न्यू स्टाइल जास्त भाज्या यूज करून ही भाजी बनवली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा Gital Haria -
रवा मिक्स व्हेज कटलेट्स
#Lockdownलॉक डाऊन च्या वेळेत मधल्या वेळेत खायला काय बनवायचं हा एक मोठ्ठा प्रश्न झाला आहे .बनवायला सोप्पी आणि घरी असलेल्या थोड्या थोड्या भाज्यां नि हे कटलेट्स बनवले .😍 Jayshree Bhawalkar -
पावभाजी दाबेली
# lockdown आता सगळ्यांनाच घरात राहावे लागत आहे त्यामुळे थोड्या थोड्या प्रमाणात का होईना बरेचसे पदार्थ घरात बनवले जातात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण असू शकतात की कदाचित त्या एका वेळेस संपत नाहीत अशा वेळेस थोड्या-थोड्या उरलेल्या भाज्यांत असणार आपण पावभाजी सारखे भाजी बनवून त्यापासून दाबेली तयार करू शकतो वती पौष्टिक तर बनतोच शिवाय चवीला पण वेगळा पदार्थ तयार होतो Shilpa Limbkar -
बटर पावभाजी (Butter pavbhaji recipe in marathi)
#स्ट्रीटस्ट्रीट फूड म्हटल की मुंईतील रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाऊच्या गाड्या दिसतात. वडापाव, पावभाजी, तवा पुलाव, चाट किती तरी पदार्थ डोळ्यासमोर येतात. असच मी आज तुम्हाला दाखवते मुंबईची पावभाजी एक्स्ट्रा बटर मारके. चला मग बघू कशी करायची . प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
मुंबई स्ट्रीट फूड पावभाजी (pav bhaji recipe in marathi)
मुंबईमध्ये लोकप्रिय पदार्थापैकी पावभाजी हे एक स्ट्रीट फूड आहे.गरमागरम भाजी त्यात वरून टाकलेला कांदा, कोथिंबीर आणि खूप सारे बटर😊 जोडीला बटर लावून गरम केलेले मऊ लुसलुशीत पाव.... हे कॉम्बिनेशनच भारी आहे.चला तर मग रेसिपी पाहुयात...😊 Sanskruti Gaonkar -
पावभाजी (PAV BHAJI RECIPE IN MARTAHI)
#GA4 #Week24 puzzle मधे... *Cauliflower* हा Clue ओळखला आणि बनवली "पावभाजी". Supriya Vartak Mohite -
पावभाजी.. butterly saga.. 😋 (pav bhaji recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर रेसिपी नं. 4 पावभाजी..मुंबईच्या इतिहासातील अजून एक चविष्ट पान..मुंबईची खाद्यसंस्कृतीच..भेळ,वडापाव आणि पावभाजी हे या संस्कृतीचे अविभाज्य घटक..यांच्या शिवाय मुंबईचा विचार अशक्यच..रस्तो रस्ती हातगाड्या,खाऊगल्ल्या,हॉटेल्स मध्ये यांचा नंबर पहिलाच बरं का.. पाव भाजीचा खमंग सुवास दरवळला ,तव्यावर कालथ्याची विशिष्ट लय,नाद ऐकला की सगळ्यांचेच पाय पावभाजी कडे वळतात..अगदी आबालवृद्ध,गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेदभाव ही पावभाजी पाळत नाही..सगळ्यांच्याच मनावर आजतागायत अधिराज्य गाजवणारा हा पदार्थ आहे..म्हणून तर पावभाजीला डावलून आपले कुठलेच समारंभ पार्टीज होऊच शकत नाही..सगळ्यांचीचall time favourite dish 😍😋मला आठवतंय 1978-79साली आम्ही पहिल्यांदा पावभाजी हा शब्द ऐकला होता..त्याच सुमारास पावभाजीचं मुंबईत आगमन झालं होतं..आईची मैत्रीण महाजन मावशी यांनी आईला पावभाजी ची रेसिपी दिली होती..मग एका रविवारी आईने पावभाजी समारंभ पहिल्यांदा घरी घडवून आणला..त्या नंतर मग एवढ्या चविष्ट समारंभाच्या मैफिली वारंवार घडत गेल्या त्या आजतागायत..तुम्हांला सांगितलं तर मजा वाटेल तेव्हां पावभाजीत थोडा पालक पण घातला जात असे..काळानुरुप या रेसिपी मध्ये बरेच बदल झालेत तरी पण खमंगपणा,तो वेड लावणारा वास मात्र तोच तसाच कायम आहे..त्यावेळी CST पूर्वीचे VT स्टेशन समोरची कॅननची पावभाजी खूप प्रसिद्ध होती..तसंच ताडदेवची सरदार पावभाजी पण प्रसिद्ध.. संपूर्ण भारतच नव्हे तर जगातील सर्व भारतीय या पावभाजी नामक राणी वर कायमच लुब्ध झालेत..तर अशा या राणीला माझी मैत्रीण दीप्ती पडियार कशी पेश करते ते मी cooksnap केलंय.दिप्ती तुझी ही पावभाजी ची रेसिपी खूप मस्त,खमंग आहे..सगळ्यांनी बोटं चाटून पुसून पावभाजीख Bhagyashree Lele -
♦️आले बटाटा वडी
♦️आपल्या आल्याचा भरपूर वापर होतो . चहा तर नेहेमीच होतोमी उप्पिट ,पोहे अथवा भाज्या ,रस्सा यात पण त्याचे पातळ काप वापरतेया आहेत आल्याच्या आणि बटाट्याच्या वड्या, नेहमीच्या आलेवडी किंवा आलेपाक पेक्षा तशा मऊ असतात.मात्र करायला सोप्या आणि चवीलाही छान.थंडीच्या मोसमात चवदार आणि पौष्टिक P G VrishaLi -
पावभाजी... फ्लॉवरची. (pavbhaji recipe in marathi)
#pcr # पावभाजी... आज मी कुकरमध्ये, फ्लॉवरची भाजी बनविली आहे.. पावसोबत खाण्यासाठी... घरी जे उपलब्ध होते, त्यातून.. Varsha Ingole Bele -
स्ट्रीट स्टाईल दो तडकेवाली तवा बटर पावभाजी (tava butter pavbhaji recipe in marathi)
#स्नॅक्स- ७#रविवार-पावभाजीएकीकडे रस्त्याकाठी टपऱ्यांमध्ये, हातगाड्यांवर सुरू झालेले हे खाद्यपदार्थ पाहिले की,तोंडाला पाणी सुटते...😋😋 पण,हेच चमचमीत पदार्थ आपण घरीदेखील बनवून खाऊ शकतो.ही पावभाजी नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे. कसूरी मेथी,बटर, पौष्टिक भाज्यांची भरपूर अशी पावभाजीची रेसिपी आहे.असाच एक माझा आवडता प्रकार, स्ट्रीट स्टाईल पावभाजी...😊 Deepti Padiyar -
-
-
पावभाजी आणि मसालापाव मक्खन मारके (pavbhaji ani masalapav recipe in marathi)
#KS8" खाऊगल्ली स्पेशल"👍"पावभाजी आणि मसालापाव मक्खन मारके "#महाराष्ट्र_स्ट्रीट_स्पेशल_रेसिपी पावभाजी म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय....आणि खाऊगल्लीतील माझ्या रोजच्या विझिटच ठिकाण...!! खाऊगल्ली असो,गार्डन असो,किंवा चौपाटी किंवा मग फूड मॉल पावभाजी मिळणार नाही असं कधीच होणार नाही..!!! माझ्या लहानपणी साधारण मी 6-7 वर्षाची असताना पहिल्यांदा पावभाजी खाल्ली होती, आमच्या शेजारचे मक्खन चाचा खूपच मस्त पावभाजी बनवायचे...👌👌 त्यांचं नाव पण मख्खन आणि पावभाजी मध्ये पण मख्खनच मख्खन...👌👌 चाचा गुजराथी होते, आणि जेवण इतकं सुंदर आणि मस्त बनवायचे, एखादया सुगरणीला पण इतकं टापटीप,आणि कमालीचं जेवण बनवायला ते मागे टाकतील....!!! तेव्हा त्यांच्याकडे पितळेचा स्टोव्ह होता, ते अगदी मांडी घालून बसायचे आणि बस.. घंटोका काम मिनिटोमे... अस... पटकन काहींना काही कमालीचं बनवायचे, पावभाजी मुगडाळ खिचडी ही तर त्यांची खासियत...!! आणि कदाचित त्यांच्यामुळेच माझे बाबा ही त्यांच्याप्रमाणे अगदि अप्रतिम पावभाजी बनवतात...!! चला तर मग मस्त अशा मक्खन वाल्या पावभाजी आणि मसाला पावची रेसिपी बघुया...👌👌👍👍 Shital Siddhesh Raut -
🥕मूग डाळ +गाजर आप्पेआणि गाजराची चटणी
🥕चविष्ट पौष्टिक पोटभरू नाश्ताकोणतीही तयारी न करता कमी वेळात होणारी एक मस्त पाककृती 😋 P G VrishaLi -
-
पाव भाजी (pav bhaji recipe in marathi)
चटपटीत खायला कोणाला ही आवडत त्यात पाव भाजी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय. Mrs. Snehal Rohidas Rawool -
पाव भाजी (Pavbhaji recipe in marathi)
#SFR स्ट्रीट फ्रूट रेसिपीज स्पेशल या किवर्ड साठी मी माझी पाव भाजी ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
पावभाजी (Pav Bhaji Recipe In Marathi)
नाश्ता म्हटलं की खमंग पावभाजी आणि बटर मधून परतून घेतलेले पाव सर्वांनाच आवडतात. गरम गरम वाफाळती पावभाजी असावी वरून लिंबाचा रस टाकावा वर एक चमचा बटर सोडावे आणि घरातल्या सर्व मंडळींना ती आवडावी, त्यानंतर आपल्या चेहऱ्यावर नक्कीच समाधान येते. तर बघूया सर्वांना आवडणारी पाव भाजीची रेसिपी. Anushri Pai -
-
More Recipes
टिप्पण्या