पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep

#स्नॅक्स

पावभाजी (pav bhaji recipe in marathi)

#स्नॅक्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. भाजीसाठी:
  2. 2मोठी गाजर
  3. 1बीट
  4. 3मोठी बटाटे
  5. 3कांदे
  6. 1-2सिमला मिरची
  7. 1/2फ्लॉवर
  8. 15-20 फरसबी शेंगा
  9. 2मोठे लाल टोमॅटो
  10. 1/4 कपमटार
  11. 2 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  12. 2 टेबलस्पूनरंगाचा लाल तिखट
  13. 1 टेबलस्पूनवाडवळी मसाला
  14. 2 टीस्पूनहळद
  15. 1/4 कपबटर
  16. 4पळी तेल
  17. 1 टेबलस्पूनआले-लसूण पेस्ट

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्यावे... मी इंडियन मार्केटला गेल्यावर इंडियन भाज्या एकदाच महिन्याभरासाठी आणून ठेवते... म्हणून प्रत्येक भाजीला लागणाऱ्या भाजी चा भाग वेगळा बांधून फ्रीज करून ठेवते... तुम्ही ताज्या भाज्या असल्यास त्या वापराव्यात...

  2. 2

    गाजर, बीट, फरसबी, भोपळा मिरची, बटाटे 1 टीस्पून हळद आणि मीठ घालून सात ते आठ शिट्टी घेऊन उकडून घ्यावे... मी मटार आख्खे घालते... ते उकडुन मॅश करत नाही... तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालावे...

  3. 3

    भाज्या उकडेपर्यंत एका पॅनमध्ये चार पळी तेल घालून त्यामध्ये कांदा परतून घ्यावा... कांदा मऊ झाल्यावर त्यात आलं-लसणाची पेस्ट घालावी आणि तीन ते चार मिनिट छान परतून घ्यावी... पावभाजी मध्ये तेलाचे प्रमाण थोडे जास्त असते म्हणून मी ऑलिव ऑइल वापरते... तुमच्याकडे ऑलिव ऑइल अवेलेबल असेल तर ते नक्की वापरून पहा चव खूप छान येते... हेल्दी आणि टेस्टी सुद्धा...

  4. 4

    आता त्यामध्ये लाल तिखट, मीठ, हळद आणि वाडवळी मसाला घालून मिक्स करून घ्यावे... वाडवळी मसाल्या ऐवजी तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला मिक्स मसाला वापरू शकता... हे सर्व मसाले छान परतून घ्यावे आणि मग त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट करून घालावी... मीठ घालताना आपण भाज्या उकडताना मीठ घातले आहे हे लक्षात ठेवावे...

  5. 5

    टोमॅटोला तेल सुटल्यावर त्यामध्ये मटार घालावे आणि अजून सात ते आठ मिनिट छान परतून घ्यावे...

  6. 6

    उकडलेली भाजी मधून पाणी वेगळा करा आणि मग भाजी मॅश करून घ्या... पाणी वेगळे केल्याने मॅष करणं सोपं जातं.. आणि व्यवस्थित मॅष होतं... हे पाणी नंतर पाव भाजीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायला वापरावं...

  7. 7

    उकडलेल्या भाज्या टाकण्याच्या जस्ट आधी पावभाजी मसाला घालावा आणि दोन ते तीन मिनिटं परतून घ्यावा...पावभाजी मसाला आधीच घातल्याने त्याचं सुगंध कमी होतो म्हणून तो नेहमी उशिरा घालावा... मसाला परतल्यावर त्यात उकडलेल्या भाज्या घाला आणि इथून पुढे बटरचा वापर सुरू करावा... भाजी पाणी न टाकताच थोडे थोडे बटर घालून आठ ते दहा मिनिटं सतत हलवत छान परतून घ्यावी... ह्या आठ ते दहा मिनिटात सर्व पाव कप बटर संपवावे... भाजी जेवढी जास्त परतु तेवढी सुंदर टेस्ट येते...

  8. 8

    परतलेल्या भाजीमध्ये आता आवश्यकतेनुसार पाणी घालून, झाकण ठेवून चांगले पंधरा ते वीस मिनिट मंद गॅसवर शिजू द्यावे... आपली भाजी तयार...

  9. 9

    पावभाजी वाढताना वरून थोडे बटर घालून कांदा आणि लिंबू जोडीला आणि मस्त बटर मध्ये भाजलेले पाव देऊन खायला घ्यावी... कोथिंबिरी बद्दल म्हणाल तर कोथिंबीर न घालता पावभाजी जास्त छान लागते... कोथिंबिरीने भाजीचा फ्लेवर कमी होऊन कोथिंबिरीचा वाढतो असं माझं पर्सनल मत आहे बाकी आपल्या आवडीनुसार... मला येथे पाव मिळाले नाही म्हणून मी ब्रेड जोडीला खाल्ली... तसेही सिंगापूरमध्ये सर्वच पाव अगदीच गोड असतात... आपल्या मुंबईसारखे सुंदर भाव पाव इथे मिळतच नाहीत... लोकल बेकरी मधील फ्रेंचलोफ सोडला तर सर्वच ब्रेड गोडुस असतात..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Komal Jayadeep Save
Komal Jayadeep Save @Komal_Jayadeep
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes