पाणीपुरी/गुपचुप/गोलगप्पे

Kshama Wattamwar
Kshama Wattamwar @cook_21826654

#पाणीपुरी
सध्याच्या lockdown मध्ये सर्वांना काहीतरी नवीन, चटपटीत पदार्थ हवे आहे.
आणि त्यात पाणीपुरी म्हणजे माझी सर्वात आवडती डिश.
कधीपण खाऊ शकते.
बाहेर पाणीपुरी भेटणार नाही आणि खायची तर तीव्र इच्छा झाली.

मग काय ठरवलं की ' हो जाए घर पर ही पाणीपुरी'.

घेतल सर्व साहित्य आणि सुरू केली रेसिपी

पाणीपुरी/गुपचुप/गोलगप्पे

#पाणीपुरी
सध्याच्या lockdown मध्ये सर्वांना काहीतरी नवीन, चटपटीत पदार्थ हवे आहे.
आणि त्यात पाणीपुरी म्हणजे माझी सर्वात आवडती डिश.
कधीपण खाऊ शकते.
बाहेर पाणीपुरी भेटणार नाही आणि खायची तर तीव्र इच्छा झाली.

मग काय ठरवलं की ' हो जाए घर पर ही पाणीपुरी'.

घेतल सर्व साहित्य आणि सुरू केली रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. पुरी साठी:
  2. 1 वाटीजाड रवा
  3. 1/2 वाटीमैदा
  4. मीठ चवीनुसार
  5. कोमट पाणी
  6. पाणी साठी:
  7. 1 वाटीपुदिना पाने
  8. 1 वाटीकोथिंबीर
  9. 1/2 चमचामीठ
  10. काळे मीठ
  11. 2हिरवी मिरची (गॅसवर भाजून घ्यावे)
  12. 1/2 चमचालिंबू रस
  13. 1/2 चमचापाणीपुरी मसाला
  14. 1 लिटरपाणी
  15. बाकीचे साहित्य:
  16. अर्धी वाटी पांढरा वाटाणा ४-५ तास भिजत ठेवून नंतर मीठ घालून शिजवून घेणे
  17. 1कांदा बारीक चिरलेली
  18. 1 वाटीबारीक शेव
  19. चिंचेची चटणी
  20. मोड आलेली मटकी (optional)

कुकिंग सूचना

  1. 1

    पुरीची कृती: रवा, मैदा, मीठ टाकून मिक्स करावे. कोमट पाणी अगदी थोडे थोडे मिश्रणात टाकत मिक्स करून घट्ट मळून घ्यावे. त्यावर ओला मलमल कापड झाकून ठेवावे २०-२५ मिनिटे.

  2. 2

    तयार कणिकेला थोडे तेल लावून अजून छान मळून घ्यावे. दोन भाग करून एका गोळ्याची पोळी लाटून घ्यावी. खूप पातळ नको किंवा जाडसर नको. एका छोट्या डब्बीच्या झाकणाने पुऱ्या कट करून घ्या. तयार पुऱ्या ओल्या कपड्याने झाकून ठेवा.

  3. 3

    कढई मध्ये तेल गरम झाल्यावर मंद आचेवर ३-४ पुऱ्या तळून घ्या आणि पेपर वर टाका. प्लेन पांढरा पेपर असावा, न्यूजपेपर नको. Tissue paper chalel. सर्व पुऱ्या खुसखुशीत तळून तयार.

  4. 4

    मसाला पाणी कृती: पुदिना, कोथिंबीर, मीठ, भाजलेली हिरवी मिरची, लिंबूरस सर्व मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. तयार मिश्रणात थोडे पाणी घालून, १ लिटर पाण्यात हे मिश्रण गाळून घ्यावे. थोडे काळे मीठ, एव्हरेस्ट पाणी पुरी मसाला १/२ चमचा टाकून मिक्स करावे. चव पाहून लागल्यास थोडे मीठ टाकावे. (टीप: लिंबू रस मुळे पाणी काळे पडत नाही)

  5. 5

    तयार ७-८ पुऱ्या फोडून ताटात ठेवणे. त्यात कांदा, वाटाणा, बारीक शेव, चिंच चटणी टाकून तयार ठेवणे, पुदिना पाणी एक एक पुरी मध्ये भरून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kshama Wattamwar
Kshama Wattamwar @cook_21826654
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes