पाणी पुरी

Prajakta
Prajakta @cook_22428650

पाणी पुरी म्हटले तर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते मला रेसिपी लिहिताना पण तोंडाला पाणी येत आहे नुसत्या विचाराने. आताच्या परिस्थिती मधे बाहेर सगळे बंद म्हणून मी पाणी पुरी चा बेत केला. आपल्याला बाहेरून पुरी विकत घेता येते पण सध्या सगळी दुकानें बंद मग ठरवले आपण घरी पुरी बनवू. हा माझा पहिलाच प्रयत्न पुरी घरी बनवायचा पण म्हणतात ना इच्छा तिथे शक्ती अगदी तसें झाले. माझा प्रयन्त यशस्वी झाला. माझ्या व्हाट्सअप च्या स्टेटस मुळे खूप साऱ्या मैत्रीनीना प्रोत्साहन मिळाले घरी पुरी बनवायचे एकूण खूप आनंद झाला. मनात आले तर आपण अशक्य पण शक्य करू शकतो. माझा प्रयत्न यशस्वी झाला खूप आनंद आहे म्हणून मी ही रेसिपी सर्वांन सोबत share करत आहे. नक्की करून पहा. घरचे जेवढ्या आनंदाने खातात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा तो भाव पाहून मनाला खूप बरे वाटते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 2 वाटीमैदा
  2. 2 वाटीजाडा रवा
  3. 2 चमचेगरम तेल
  4. 1 वाटीगरम पाणी
  5. चवीपुरते मीठ
  6. 2उकडलेले बटाटे
  7. १/४ कपशिजवलेले सफेद वाटाने
  8. १ टि स्पुनजिरे
  9. तेल
  10. 5-7खजूर
  11. थोडा सा गूळ आणि चिंच
  12. 1 टीस्पूनलाल तिखट पावडर
  13. 4-5हिरव्या मिरच्या
  14. 50 ग्रॅमकोथमीर
  15. २० ग्रॅमपुदिना
  16. १ टेबलस्पूनपाणी पुरी मसाला
  17. 1 टिस्पुनजलजिरा
  18. 1लिंबू
  19. किंचित साखर

कुकिंग सूचना

  1. 1

    2 वाटी जाड रवा आणि 1 वाटी मैदा यामध्ये तेल गरम करून टाकणे आणि छान मिक्स करून घेणे मग थोडे थोडे गरम पाणी टाकून कणिक मळून घेणे. अर्धातास कणिक मुरत ठेवणे. अर्धा तासांनी चपाती प्रमाणे गोळा घेऊन पातळ चपाती लाटणे. कुठल्याही लहान आकाराच्या भांड्याने पुरीचे आकार काढणे. तेल गरम करून मंद आचेवर पुरी तळणे. छान फुलतात आणि मग गोल्डन ब्राउन झाल्यावर काढणे.

  2. 2

    रगडा साठी कुकर मधे बटाटे आणि वाटाणे आणि थोडी हळद टाकणे आणि 3-4 शिट्या काढणे. कढई मधे तेल टाकणे त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकणे, मग उकडलेला बटाटा चिरून टाकणे आणि तेला मधे थोडा परतून घेणे. नंतर शिजवलेले वाटाणे पाण्यासहीत टाकणे. तुम्हाला जर अजून पाणी टाकायचे असल्यास टाकू शकता. 10-15 मिनिट झाकण ठेऊन शिजवून घेणे. मग गॅस बंद करणे. रगडा तयार झालेला असेल.

  3. 3

    गोड चटणी साठी चिंच, गूळ आणि खजूर एका भांड्या मधे थोडे पाणी टाकून गॅस वर ठेऊन एक उकल काढणे. मग मिक्सर मधे घालून त्यामध्ये चवीपुरते मीठ आणि लाल मिरची पावडर घालणे आणि वाटून घेणे. बारीक वाटून झाल्यावर तुम्हाला हवे असल्यास थोडे पाणी मिक्स करून गाळणीने गाळून घेणे.

  4. 4

    तिखट पाणी साठी कोथमीर, पुदिना, हिरवी मिरची मिक्सर मधे बारीक करून घेणे एका भांड्या मधे हे वाटप काढणे त्यामध्ये पाणी घालणे. पाणी पुरी मसाला, जलजिरा, लिंबू, चवीपुरते मीठ आणि थोडी साखर घालून ढवळणे. मग हे मिश्रण गाळणीने गाळून घेणे.

  5. 5

    तयार झाली आपली सगळ्यांची आवडती पाणी पुरी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Prajakta
Prajakta @cook_22428650
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes