रसिया मुठीया(गुजराती पदार्थ)

Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282

#बेसन

सध्या वास्तव्य गुजरातमध्ये असल्यामुळे गुजराती पारंपारीक पदार्थ बनवणे सुरु आहे. रसिया मुठीया कमीतकमी साहित्यात बनवून होते शिवाय एकदम पोटभरीचे खाणे होते.

रसिया मुठीया(गुजराती पदार्थ)

#बेसन

सध्या वास्तव्य गुजरातमध्ये असल्यामुळे गुजराती पारंपारीक पदार्थ बनवणे सुरु आहे. रसिया मुठीया कमीतकमी साहित्यात बनवून होते शिवाय एकदम पोटभरीचे खाणे होते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. मुठीयासाठी
  2. 1/2 कपबेसन
  3. 4 कपशिजलेला भात(शिळा भात पण वापरु शकता)
  4. 1 टीस्पून तिखट
  5. 1/2 टीस्पून हळद
  6. 1/4 कपबाजरीचे पीठ(optional)
  7. 2 टीस्पून धने,जीरे,अदरक ची पेस्ट
  8. चवीनुसारमीठ
  9. वळण्यापुरते पाणी
  10. रसियासाठी
  11. 4 कपपातळ ताक
  12. 1 टीस्पून तेल
  13. 1/4 टीस्पून मोहरी व जीरे
  14. 1/4 टीस्पून हळद
  15. 1/2 टीस्पून तिखट
  16. 1 टेबलस्पून साखर
  17. चिमूटभरहिंग
  18. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    शिजलेल्या थंड भातात हळद,तिखट टाका

  2. 2

    अदरक पेस्ट,बेसन,बाजरी पीठ,मीठ टाका

  3. 3

    वळण्यापुरते पाणी टाकून मिक्स करा.पाहिजे असल्यास गोल आकार द्या.मी आकार न देताच हाताने टाकले.रसियासाठी पॅन मध्ये तेल गरम करा.तेल तापल्यावर मोहरी,जीरे,हिंग टाका.तिखट,हळद टाकून सर्व ताक टाकून पाच मिनिटे उकळा.मीठ,साखर टाका.

  4. 4

    उकळल्यानंतर भाताचे मुठीया हळुहळु रसिया मध्ये सोडा.पाच मिनिटे मंद गॅसवर झाकून ठेवा.

  5. 5

    शिजल्यावर आपोआप वर येतात मुठीया.

  6. 6

    गरमागरम रसिया मुठीया खाण्यात गुंग होवून जा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Archana Sheode
Archana Sheode @cook_20765282
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes