मेथीना मुठीया (methi muthiya recipe in marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#पश्चिम #गुजराती
मेथी ना मुठीया हा पदार्थ गुजराती लोकांमध्ये नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात करतात.आपल्याला नेहमी भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला की,करता येईल.पौष्टिक आहे आणि पोटभरीचाही! सोबत दही, चटणी, लोणचे काहीही चालते.

मेथीना मुठीया (methi muthiya recipe in marathi)

#पश्चिम #गुजराती
मेथी ना मुठीया हा पदार्थ गुजराती लोकांमध्ये नाश्त्याला किंवा रात्रीच्या जेवणात करतात.आपल्याला नेहमी भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला की,करता येईल.पौष्टिक आहे आणि पोटभरीचाही! सोबत दही, चटणी, लोणचे काहीही चालते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 जणांसाठी
  1. 1 वाटी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली मेथी
  2. 100 ग्रॅम कणीक
  3. 50 ग्रॅम बेसन
  4. 25 ग्रॅम बारीक रवा
  5. 1 टेबलस्पूनहिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण वाटून
  6. 2 टिस्पून साखर
  7. 2-3 टेबलस्पूनतेल
  8. 1 टिस्पून तीळ
  9. चवीनुसार मीठ
  10. 1 टिस्पूनजिरे फोडणीसाठी
  11. 1 टिस्पूनमोहरी
  12. 7-8पाने कढिपत्ता
  13. 1 चिमूटभर सोडा
  14. 1 टिस्पूनहळद

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    एका पसरट भांड्यात चिरलेली मेथी घेऊन त्यात मीठ,वाटण, साखर,1 टेबलस्पून तेल, हळद,सोडा घालून मिसळून घ्या.

  2. 2

    आता त्यात रवा, कणीक, बेसन घालून एकजीव करा.गोळा बनवा.गोळ्याचे दोन रोल बनवा.

  3. 3

    कुकरच्या डब्याला तेलाचा हात लावून त्यात रोल ठेवून 15 मिनिटे वाफवून घ्या.

  4. 4

    रोलचे तुकडे करून तेलाची मोहरी जिरे फोडणी करून तीळ, कढिपत्ता घालून मुठीये तुकडे घालून छान मिक्स करून गरमच सर्व्ह करा मेथी ना मुठीया!!!

  5. 5

    सोबत दह्याची चटणी,साॅस द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes