चुबक वडी रस्सा (chubak wadi rassa recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#बेसन
वैदर्भिय खाद्यखजिना
भाज्या संपल्या ,टेंशन नको
चुबक वडीरस्सा सोबत दोन घास जास्त जातील .

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

२५ मिनिटे
२ ते ३
  1. १२५ ग्रॅम बेसन
  2. 1मोठा कांदा भाजलेला
  3. 1मोठा टोमॅटो भाजलेला
  4. २० ग्रॅम खोबर्याचा तुकडा भाजलेला
  5. १५ ग्रॅम भाजलेले शेंगदाणे कुट
  6. १५ ग्रॅम भाजलेले तीळ
  7. 1 टिस्पुनओवा
  8. 2 टिस्पुनतिखट
  9. 1/2 टि स्पुनहळद
  10. 2 टिस्पुनसावजी मसाला नसल्यास गरम मसाला
  11. 2 टिस्पुनआलंलसुण पेस्ट तेल भाजीला जरा जास्तच आणि वड्या तळणा करीता
  12. मीठ गरजेनुसार

कुकिंग सूचना

२५ मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एका पसरट भांड्यात बेसन घेऊन त्यात हळद, मीठ, ओवा व दोन टिस्पून गरम तेलाचे मोहन घालुन घट्ट भिजवुन बाजुला ठेवावे.

  2. 2

    एकीकडे टोमॅटो, कांदा व खोबरं भाजुन घ्यावे,खोबरं, तीळ,कांदा व शेंगदाणा कुटाची एकत्र पेस्ट करावी, तसेच भाजलेल्या टोमॅटोची सुद्धा सालं काढुन पेस्ट करावी.

  3. 3

    एव्हाना भिजवलेलं बेसन मुरलेलं असल्याने त्याचे अगदी छोटे छोटे गोळे करून खमंग तळुन घ्यावेत

  4. 4

    त्याच तेलात आता आधी आलं लसुण पेस्ट घालणे,ती जरा होत आली की कांदा खोबरं,शेंगदाणेची पेस्ट घालावी व खमंग परतत राहावे,

  5. 5

    आता टोमॅटोचीपेस्ट, मीठ, सावजी मसाला, तिखट ई एकत्र वरील पदार्थात घालावे,व भांड्याच्या कडेला तेल सुटेपर्यंत मिश्रण हलवत राहावे.

  6. 6

    आता ह्या मिश्रणात आवश्यक पाणी घालावे व पाण्याला ऊकळी आली की हे तळलेले गोळे (चुबक वड्या) पाण्यात सोडावे, साधारण पाच ते सात मिनिटात ह्या चुबकवड्या मसाला व पाण्यात मुरून शिजतात व रस्सासुद्धा खाण्याईतपत दाट होतो तेव्हा गॅस बंद करावा.

  7. 7

    आपण ह्या रस्स्यात कोथिंबीर घालतोच पण माझ्याकडे नेमकी ऊपलब्ध नसल्याने मला वापरता आली नाही.
    ही पाककृति म्हणजे अस्सल वैदर्भिय पारंपारिक खाद्यखजिनाआहे. सोबत असावी कच्चा कांदा, लिंबु आणि भाकर,
    आईशप्पथ तुम्ही देणारच तृप्ती ची ढेकर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या (8)

Deepali Pethkar-Karde
Deepali Pethkar-Karde @cook_24223212
Aamchyakade yala Golyanchi aamti boltat
Ekdam mast zanzanit kartat

यांनी लिहिलेले

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes