साबुदाणा खीर (sago recipe in marathi)

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

#फोटोग्राफी साबुदाणा म्हटल की आपल्याला उपास आठवतात, साबुदाण्याचे अनेक छान पदार्थ आहेत. साबुदाण्याची खीर हा त्यातील एक. मी आज केली होती साबुदाण्याची खीर मुलांना संध्याकाळी खायला, पौष्टिक आणि त्यांना आवडते पण खूप. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा.

साबुदाणा खीर (sago recipe in marathi)

#फोटोग्राफी साबुदाणा म्हटल की आपल्याला उपास आठवतात, साबुदाण्याचे अनेक छान पदार्थ आहेत. साबुदाण्याची खीर हा त्यातील एक. मी आज केली होती साबुदाण्याची खीर मुलांना संध्याकाळी खायला, पौष्टिक आणि त्यांना आवडते पण खूप. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1/2 कपसाबुदाणा
  2. 1 1/2 कपदूध
  3. 2 टेबलस्पूनसाखर
  4. 1 टीस्पूनवेलची पूड
  5. 1/4 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स (पर्यायी)
  6. बदामाचे काप

कुकिंग सूचना

  1. 1

    ७/८ तास आधी साबुदाणा स्वच्छ पाण्याने धुवावा. किमान ३/४ वेळा धुवावा.मग त्यात अगदी थोडे पाणी घालून भिजवून ठेवावा.

  2. 2

    मग एका भांड्यात घेऊन त्यात दूध घालावे व गॅस वर ठेवावे. साबुदाणा सतत हलवत रहावा नाही तर भांड्याला खाली राहू शकतो. साबुदाणा दुधात शिजू लागला की त्यात साखर, इसेन्स व थोडी वेलची पूड घालावी व परत थोडा शिजवावा. गरज वाटल्यास थोडे जास्त दूध घालावे. साबुदाणा पूर्ण शिजला की खीर एका बाउल मध्ये काढून त्यावर बदामाचे काप घालावेत व खीर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

Similar Recipes