शेवयांची खीर

प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
प्राची मलठणकर (Prachi Malthankar) @thewarmPlate
Frisco Texas

आज अक्षयतृतीया असल्या निमित्य खीर पूरीचा बेत केला. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा.

शेवयांची खीर

आज अक्षयतृतीया असल्या निमित्य खीर पूरीचा बेत केला. माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपरोस्टेड शेवया ( रोस्टेड नसतील तर थोड्या तुपावर रोस्ट करून घ्याव्यात.)
  2. 5 कपदूध
  3. 1 टेबलस्पूनतूप
  4. 1/2 कपसाखर,
  5. 1/2 कपबदाम, बेदाणे, काजू चे तुकडे
  6. ७/८ केशर कांड्या
  7. 1 टीस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका पॅन मध्ये थोड तूप घेऊन शेवया थोड्या भाजून घेणे. गॅस कमी ठेवणे. मग त्यात ५ कप दूध घालून शेवया व दूध सतत हलवत राहणे. शेवया तळाला लागता कामा नये. दुधाला उकळी आली की त्यात साखर घालून परत दूध हलवणे.शेवया शिजेपर्यंत आणि दूध आटेपर्यंत करणे दूध हलवणे. दूध आटले की खीर छान क्रिमी होते.

  2. 2

    मग त्यात सर्व ड्राय फ्रूटस घालणे, वेलची पूड व केशर घालून परत एकदा मिक्स करून गॅस बंद करणे. एका बाउल मध्ये खीर काढून पुरी वा पोळी बरोबर सर्व्ह करणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
रोजी
Frisco Texas

Similar Recipes