पोटॅटो चीज बॉल्स (POTATO CHEEES BALLS RECIPE IN MARATHI)

Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
Pune

#myfirstrecepie
कमीत कमी साहित्य मध्ये होणारी आणि लहान मुलांसोबत मोठ्यांना ही खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. जेव्हढी बाहेरून दिसायला आकर्षक तेव्हढीच खाताना तोंडात विरघळून जाणार चीज लज्जत वाढवतं..

पोटॅटो चीज बॉल्स (POTATO CHEEES BALLS RECIPE IN MARATHI)

#myfirstrecepie
कमीत कमी साहित्य मध्ये होणारी आणि लहान मुलांसोबत मोठ्यांना ही खूप आवडेल अशी ही रेसिपी आहे. जेव्हढी बाहेरून दिसायला आकर्षक तेव्हढीच खाताना तोंडात विरघळून जाणार चीज लज्जत वाढवतं..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१८_२० चीज बॉल्स साठी
  1. उकडलेले बटाटे तीन
  2. चार चमचे (टेबल स्पून)कॉर्नफ्लॉवर
  3. 1/2 चमचाआले लसूण पेस्ट
  4. हिरवी मिरची एक वाटून घेऊन
  5. 1/4 चमचाकाळी मिरी पावडर
  6. लाल तिखट
  7. चवीप्रमाणे मीठ
  8. अर्धी वाटी ब्रेड क्रम्स
  9. 1/4 वाटीकोथिंबीर

कुकिंग सूचना

  1. 1

    तीन बटाटे उकडून घेणे. त्यात दोन चमचे कॉर्नफ्लॉवर, काळी मिरी पावडर,तिखट, मीठ, मिरची, आले लसूण पेस्ट कोथिंबीर घालून छान मळून घेणे त्याचे फोटो दाखवल्याप्रमाणे छोटे छोटे गोळे बनवणे

  2. 2

    नंतर त्या गोळ्यांच्या मधोमध छोटा चीझचा तुकडा स्टफ करून पुन्हा गोळा नीट वळून घेणे. एका वाटी मध्ये कॉर्न फ्लॉवरचे पाणी घालून पेस्ट बनवून घ्यावी. मिक्सरला ब्रेडक्रम्स बनवून घेणे

  3. 3

    बनवलेले potato बॉल्स कॉर्नफ्लॉवर पेस्टमध्ये घोळवून पुन्हा ब्रेड क्रमस मध्ये घोळवून घ्यावे. (फोटो मध्ये दाखविल्या प्रमाणे)

  4. 4

    कढईमध्ये तेल गरम करून हे बनवलेले बॉल्स गोल्डन ब्राऊन कलर चे होई पर्यंत डीप फ्राय करून घेणे किंवा तळून घेणे

  5. 5

    तयार झालेले चीज बॉल, थोडेसे गरम असताना सॉस किंवा चिंचेच्या चटणीबरोबर खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Kulkarni Sakat
Priya Kulkarni Sakat @cook_21066941
रोजी
Pune

टिप्पण्या

Similar Recipes