गुड्डे बिस्कीट आणि केळी मिक्स शिरा

Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115

#आई 🤱 "आई" कुठलही नात निभावू शकते पण आईची जागा जगातील कुठलच नात घेऊ शकत नाही....आज मी माझ्या आईसाठी mother's day निम्मित बिस्कीट आणि केळी मिक्स करून गोड शिरा केला आहे कारण माझ्या आईला शिरा फार आवडतो.💯👍🏼

गुड्डे बिस्कीट आणि केळी मिक्स शिरा

#आई 🤱 "आई" कुठलही नात निभावू शकते पण आईची जागा जगातील कुठलच नात घेऊ शकत नाही....आज मी माझ्या आईसाठी mother's day निम्मित बिस्कीट आणि केळी मिक्स करून गोड शिरा केला आहे कारण माझ्या आईला शिरा फार आवडतो.💯👍🏼

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

फक्त १०-१५ मिनिटे शिजवायचे
३ व्यक्तींसाठी
  1. ५० ग्रॅम बारीक रवा
  2. 2 कपगरम दुध
  3. 4-5गुड्डे बिस्किटे
  4. 2पिकलेली केळी
  5. पींच (चिमूटभर) वेलची पावडर
  6. 1 टी स्पूनव्हॅनिला इसेन्स
  7. २० ग्रॅम साखर
  8. पींच (चिमूटभर) पिवळा खायचा रंग
  9. 3 टी स्पूनसाजूक तूप
  10. आवडीनुसार ड्राय फ्रुट (काजू बदाम पिस्ता तुटी फ्रुटी

कुकिंग सूचना

फक्त १०-१५ मिनिटे शिजवायचे
  1. 1

    प्रथम कढई मध्ये, साजूक तूप घेऊन शून्य नंबरचा रवा खमंग भाजून घ्यावा....रवा छान भाजला कसा हे ओळखायचे असेल तर रवा दुप्पट होऊन फुलतो म्हणजेच आपला रवा खमंग भाजला असे समजावे...💯👍🏼

  2. 2

    आता रवा भाजून झाला की त्यात आवडीचे बिस्कीट मिक्सर वर वाटून बारीक पावडर करावी....मी येथे गुड्डे बिस्किटे घेतलेली आहेत....💯👍🏼 त्यात लगेचच साखर घालावी.....आणि छान मिक्स करावे💯👍🏼

  3. 3

    आता त्यात केळी बारीक चिरून घालावी...त्यात व्हॅनिला इसेन्स, वेलची पावडर, ड्राय फ्रुट आणि खायचा पिवळा रंग घालून एकजीव करून मिक्स करावे....गॅस पूर्ण मंद आचेवर ठेवावा💯👍🏼

  4. 4

    आता यात कोमट दूध घालून ढवळून घ्यावे...यात आवडीनुसार तुटी फ्रूटी घालून परतून घ्यावे....एकजीव करून शिरा सैलशिर मऊसूत परतून घ्यावा....आणि आता २ मिनिटे कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.....म्हणजे आपला शिरा तयार💯👍🏼

  5. 5

    आपल्या आवडीनुसार सजवून हा बिस्कीट केळीचा मिक्स शिरा सर्व्ह करावा....हा शिरा मी माझ्या आईला गिफ्ट केला आहे...💯👍🏼💝💯👍🏼💝

  6. 6

    सर्वांना आई दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🤱💐🤱

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pallavii Bhosale
Pallavii Bhosale @cook_19703115
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes