बॉम्बे कराची हलवा..बदामी हलवा. (badami halwa recipe in marathi)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Dadar..Mumbai

#Heart #A Heart-y Challenge
Valentine's Day च्या निमित्ताने माझी बर्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली बॉम्बे कराची हलवा ...बदामी हलवा ही रेसिपी करायचा योग आला..बर्याच दिवसांपासून प्रतीक्षेत याच कारण असं की दिवाळीत मिठाईच्या box मध्ये हा चकचकीत रंगीबेरंगी बदामी हलवा असतो.तसंच मिठाईच्या दुकानात गेले की हा बॉम्बे कराची हलवा मला नेहमी खुणावायचा..रंगांवर जीवापाड प्रेम करणारी मी..मला याचे आकर्षण नाही वाटले तर नवलच..चिवट असा हा हलवा तोडतानाची मजा तर औरच असते..खाताना दाताखाली येणारे dry fruits तर वाह..क्या बात है..माहीमचा हलवा आणि बदामी हलवा ही जोडगोळी..आपली गोड खायची इच्छा अगदी इमानेइतबारे पूर्ण करण्यासाठी ही जोडगोळी कायम तत्पर..
Valentine's Day साजरा करण्यासाठी प्रेमाचा बदाम❤️..याच प्रेमाच्या बदामाच्या आकारातील बदामी हलवा तयार करुन कुटुंबियांसमवेत Celebration केलंय..चला तर मग माझ्याबरोबर..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

6 जणांना
45-50 मिनीटे
  1. 1 कपकॉर्नफ्लोर
  2. 4 कपपाणी
  3. 2 कपसाखर
  4. 2 कपसाखर
  5. 1 कपपाणी
  6. 2 टीस्पूनलिंबाचा रस
  7. 6 टीस्पून साजूक तूप
  8. वेलची पावडर
  9. खायचा रंग
  10. ऑरेंज इसेन्स
  11. तुकडेकाजू बदाम पिस्ते

कुकिंग सूचना

6 जणांना
  1. 1

    प्रथम एका वाटी मध्ये कॉर्नफ्लोर घेऊन त्यात पाणी घालून मिश्रण व्यवस्थित ढवळा

  2. 2

    आता एका मोठ्या कढईत साखर घ्या आणि त्यात पाणी घाला आणि साखर पूर्णपणे विरघळेपर्यंत एकसारखे ढवळत राहा

  3. 3

    आता तयार केलेले कार्नफ्लोर चे मिश्रण हळूहळू साखरेच्या मिश्रणात ओतत रहा आणि एकीकडे मिश्रण सतत हलवत रहा

  4. 4

    वरील मिश्रण दाटसर होईपर्यंत ढवळत राहा आता यात लिंबाचा रस घालून सारखे ढवळत राहा. आता दोन चमचे तूप या मिश्रणात घालून व्यवस्थित मिक्‍स करून घ्या.. मिश्रणात तूप शोषले गेले की अजून 2 चमचे तूप घालून परत ढवळा..हे तूप शोषले गेले की अजून 2 चमचे तूप घालून घालून मिश्रण छान ढवळा.

  5. 5

    अर्ध्या तासाने मिश्रण चकचकीत दिसेल तेव्हा खायचा रंग add करा..इसेन्स घाला..वेलची पावडर, काजू बदाम तुकडे घालून mix करा.

  6. 6

    अजून 1 चमचा तूप टाकून दहा मिनीटे मिश्रण ढवळत रहा..मिश्रण तूप सोडू लागल्यावर gas बंद करा..आणि ट्रे मध्ये ओता..आणि दीड ते दोन तासात बदामी हलवा तयार..

  7. 7

    बदामी हलव्याचे तुकडे करुन वरुन पिस्ते पसरवा आणि सर्व्ह करा..

  8. 8
  9. 9
  10. 10
  11. 11
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
रोजी
Dadar..Mumbai
trying new recipes n food photography both are kind of stress buster to me...Write ups,poems, reading, travelling ...my inner peace...😇
पुढे वाचा

Similar Recipes