सत्यनारायण प्रसाद / प्रसादाचा शिरा / केळी घालून शिरा

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

#प्रसादाचा शिरा
#सत्यनारायण प्रसाद
#केळी घालून शिरा

हा प्रसाद का कोण जाणे, पूजा घालतो घरी तेंव्हा जणू काही दैवत्व त्यात उतरते, इतका सुरेख आणि अप्रतिम लागतो, व जेवढी लोकं येतात त्या सगळ्यांना पुरून उरतो. हे या प्रसादाचे मुख्य उद्दिष्ट.

हिंदू धर्मियांमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला महत्त्व दिलं गेलं आहे. भगवान विष्णूंना नारायण रुपात पुजणे यालाच 'सत्यनारायण' म्हणतात.

विद्वानांच्या मते स्कंद पुराणातील रेवा खंडात याचा उल्लेख आहे. यातील श्लोक पाचही खंडांत विभागले गेले आहेत. यात एकूण १७० श्लोकांचा समावेश होतो.

सत्यनारायणाच्या कथेचे दोन प्रमुख विषय आहेत. यातील एक विषय आहे संकल्प करणे आणि दुसरा आहे प्रसाद.

सत्यनारायणाच्या कथा अनेक लहान लहान खंडांत विभागल्या गेल्या आहेत. यातील एक महत्त्वाची बाब अशी की त्यात सत्याला महत्त्व दिले गेले आहे. जो सत्याचे पालन केरत नाही, त्याचे आयुष्यात नुकसान होईल, असे ही कथा सांगते.

सत्याचे पालन न करणाऱ्याला भगवानच स्वतःच शिक्षा देतील असेही कथेत म्हटले आहे. म्हणूनच या कथेचे वाचन संपूर्ण कुटुंबाच्या समोर केले जाते.

सत्याची नारायण स्वरुपात पूजा करणे हे या कथेचे सार आहे. नारायण हेच सत्य असून बाकी जग मोह-माया आहे, तेव्हा नारायणाच्या पूजेत मन रमवा आणि सत्याची कास धरा, असा सल्लाही सत्यनारायणाच्या कथेतून मिळतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 ते 25 मिन
5-6.
  1. 2ते 3 टेबलस्पून मिक्स ड्राय फ्रुट्स
  2. (सव्वा पावशेर - 375 ग्राम)
  3. 375 ग्रामजाड रवा
  4. 375 ग्रामसाखर
  5. 375 ग्रामगायीचे तूप
  6. 4केळी
  7. 1 1/2 लिटरगायची दूध
  8. 1 टेबलस्पूनवेलची जायफळ पावडर
  9. 1 टेबलस्पूनकिशमिश

कुकिंग सूचना

20 ते 25 मिन
  1. 1

    रवा आधी भाजून घ्या, म्हणजे त्याचा कच्चे पणा निघून जाईल.

  2. 2

    आता जाड बुडाच्या पातेल्यात गायीचे तूप घाला, ते तापले की त्यात केळी चे तुकडे करून टाका. व ती खमंग परतून घ्यावी.

  3. 3

    आता त्यात भाजलेला रवा घाला व परत खमंग परतून घ्या, बदामी रंग येई पर्यंत.

  4. 4

    आता त्यात हळू हळू तापवलेलं गायीचे दूध घाला, व गुठळ्या होऊ न देता एकजीव करावे.

  5. 5

    आता त्यात साखर घाला. व ती व्यवस्थित मिक्स करून एकजीव करा, व झाकण टाकून वाफ काढून घ्या. व त्यात वेलची जायफळ पावडर, मिक्स ड्राय फ्रुट्स, किशमिश घालून घ्या.

  6. 6

    आता सगळे परत एकदा व्यवस्थित एकजीव करा, सत्यनारायण प्रसाद तयार. तुळशी पत्र ठेवून नैवेद्य अर्पण करावा.

  7. 7

    सर्व्ह करा

  8. 8
  9. 9
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes