शुगर फ्री पेर चा शेक (SUGAR FREE MILKSHAKE RECIPE IN MARATHI)

Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
India

ह्या पद्धतीचा पेर चा शेक मला खूपच आवडतो आमच्या घरी याला खूपच डिमांड असते. त्यामुळे हा उन्हाळ्यात केला जातो. खूप सुंदर टेस्ट असते. साखर न वापरता ही अप्रतिम चवीचा हा शेख तयार होतो. मी ह्याची रेसिपी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही घरी सगळ्यांसाठी जरूर बनवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1पेर
  2. 1टिस्पून बदाम पूड
  3. 1टिस्पून काजूू पूड
  4. 1/2 टिस्पून दालचिनी पावडर
  5. 150 मिली दूध
  6. 1/2 टिस्पून वेलची पावडर
  7. 3 टिस्पून मध
  8. 1 टिस्पून साखर (तुम्हाला आवश्यकता वाटल्यास मी इथे वापरली नाही.)

कुकिंग सूचना

  1. 1

    मी इथे साहित्यामध्ये साखर दाखवली आहे परंतु ती वापरली नाही मी सर्वांसाठी साखर हा घटक दाखवते आहे विदाऊट साखर हा खूप सुंदर बनतो मी तसाच बनवला आहे. आमच्याकडे तसाच आवडतो. पेर स्वच्छ धुऊन त्याच्या फोडी करून घ्याव्या. त्या मिक्सरच्या भांड्यात घालाव्या.

  2. 2

    आता त्यावर काजूचे बदामचे तुकडे घालून घ्यावे. मग दूध ॲड करून घ्यावे. ते झाले की त्यात दालचिनी पावडर आणि वेलची पावडर घालून घ्यावी.

  3. 3

    आता वरून मध घालून घ्यावे आणि मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यावे. आपला पेरचा मिल्कशेक तयार आहे. आता ग्लास मध्ये घालून थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घ्यावे. वरून थोडे मध आणि काजूचे तुकडे घालून त्याला डेकोरेट करून अजून टेम्पटिंग बनवून प्यायला द्यावे. त्यामुळे डोळ्यांनाही समाधान वाटते. जरुर ट्राय करा हा शुगर-फ्री पेरचा शेक.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sanhita Kand
Sanhita Kand @savikaj_re1
रोजी
India

टिप्पण्या

Similar Recipes