ॲपल बनाना मिल्क शेक (apple banana milkshake recipe in marathi

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#शेक.... सफरचंद आणि केळाचे मिल्कशेक आपल्या शरीरासाठी खूप फायदेमंद असतं. माझ्या घरी नेहमीच मी ॲपल बनाना शेक बनवत असते. कारण केळं कुचकरून दुधामध्ये साखर टाकून केलेलं कालवण मला आणि माझ्या मुलाला आवडत नाही. पण कालवण खाणे खूप छान असतं. पण माझा मुलगा मिक्सरमध्ये केलेला शेक पिताे. त्यामुळे मी त्यात ॲपल भिजवलेले बादाम ,मध, दूध टाकून शेक ला अजून हेल्दी बनवते. रोज सकाळी वर्कआउट केल्यानंतर हे मिल्क शेक पिलं तर एक हेल्दी ब्रेकफास्ट होतो. केळ आणी सफरचंदा पासून मिळणारी पोषकतत्वे आपल्याला माहितीच आहेत. यामध्ये असणारे आयर्न मॅग्नेशियम ,पोटॅशियम , फायबर आणि दुधासोबत घेत असल्यामुळे कॅल्शियम, बादाम, दूध ,मध यांचाही समावेश असल्यामुळे हा खूप हेल्दी असा शेक तयार होतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3 सर्व्हिंग्ज
  1. 2केळी
  2. 1ॲपल
  3. पाच-सहा बदाम
  4. 1/2 टिस्पून विलायची पावडर किंवा व्हॅनिला इसेन्स 2,3 थेंब
  5. 1/2 लिटरचिल्ड दूध
  6. साखर किंवा मध

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम मिक्सरच्या पॉट मध्ये केळ्याचे काप,सफरचंदाचे काप करून टाकावेत. आणि त्यामध्येच दूध, साखर किंवा मध, विलायची पावडर किंवा इसेन्स टाकून छान बारीक करून घेणे.

  2. 2

    मग काय सगळे छान बारीक झाल्यावर आपला शेक तयार.काचेच्या ग्लासमध्ये घेऊन सर्व्ह करावे आणि आपल्या फॅमीली सोबत पिण्याचा आनंद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes