चण्याच्या दाळीचा ढोकला (DHOKLA RECIPE IN MARATHI)

Manjiri Bhadang
Manjiri Bhadang @cook_21998944

#स्टीम

चण्याच्या दाळीचा ढोकला (DHOKLA RECIPE IN MARATHI)

#स्टीम

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1कप चणा डाळ
  2. 3कप बेसन
  3. 2कप ताक
  4. 10-12हिरव्या मिरच्या
  5. 15-20लसणाच्या पाकळ्या
  6. 1/4टीस्पून सायट्रिक ऍसिड
  7. 1टीस्पून सोडा
  8. 2टीस्पून मीठ
  9. 2टीस्पून साखर
  10. बारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 3-4टेबलस्पपुन तेल फोडणी साठी
  12. मोहरी, तीळ, कढीपत्ता,जिरा, मिरची, हिंंग फोडणी साठी

कुकिंग सूचना

  1. 1

    चणा डाळ 2 तास भिजवून ठेवावी, भिजलेली चणा डाळ मिक्सर मधून काढावी त्यात हिरवी मिरची, लसूण घालून वाटून घ्यावे।

  2. 2

    मग हे मिश्रण एका भांड्यात काढावे त्या मध्ये ताक व बेसन घालावे। त्यात 2 टीस्पून तेल, 2 टीस्पून साखर आणि 2 टिसपून मीठ घालून मिक्स करावे आणि ते मिश्रण 3-4 तास झाकून ठेवावे ।

  3. 3

    4 तास नंतर एका वाटीत 2टेबलस्पून पाणी आणि त्यात 1/4 टीस्पून citric acid विरघळवून घ्यावे। भांड्यातील मिश्रणावर 1 चमचा सोडा घालून हे पाणी सोडावे । त्या वर फेस येईल लगेचच ते मिश्रण एकाच दिशेने फेटावे।

  4. 4

    फेटून थोडं फुगेल मग थाळी ला तेल लावून हे मिश्रण त्यात ओतावे आणि लगेच वाफवावे 15-20 मिनिटं । 20 मिनिटांनी सूरी घालून बघावे सूरी ला चिपकत नसेल तर झाले अशे समजावे।

  5. 5

    फोडणी साठी तेल गरम करावे त्यात मोहरी, हिंग, तिळ, कढीपत्ता आणि मिरची चे तुकडे घालावे आणि फोडणी त्या वर ओतावी । वड्या पडून गरमा - गरमा सर्व्ह करावा 'ढोकला' ।

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manjiri Bhadang
Manjiri Bhadang @cook_21998944
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes