मिंट बटरमिल्क (mint buttermilk recipe in marathi)

Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698

पुदिना हा मला अतिप्रिय आहे...
मी बऱ्याच पदार्थांमध्ये पुदिना ऍड करत असते...
पुदिन्याची टेस्ट औरच आहे ना...
पुदिना क्लासिक हर्ब आहे,,,
माझ्याकडे मी आत्ता कुंडीमध्ये पुदिना लावला..
आणि छान तो कुंडी मध्ये लागला आहे, अगदी छोटासा आहे सध्या,
दोन-तीन महिन्यानंतर मोठा होईल,,
मी त्याला रोज बघते, आणि किती पणे आले त्याला हे मी बघत असते,,
छान छान कुंडीत हळूहळू वाढत आहे
आणि त्याचा वाढण्याचा मला अति कौतुक वाटतं आहे,
असे वाटते हा केव्हा मोठा होतो ,
आणि केव्हा मला ताजा पुदिना रोज सगळ्या गोष्टींमध्ये युज करता येईल,,,
असा हा माझ्या आवडीचा पुदिना..
त्या पुदिन्याचा आज मी ताक केले आहे...
खूप छान टेस्टी बनते हे ताक
..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मि
  1. 1 कपआंबट गोडसर दही
  2. 1 टीस्पूनलसूण जिरे ची पेस्ट
  3. 1हिरवी मिरची
  4. 6पुदिन्याची पानं
  5. 1/4 कपकोथिंबीर
  6. 1काळ मीठ
  7. 2 टेबलस्पूनसाखर
  8. चवीनुसारमीठ
  9. 3 कपपाणी

कुकिंग सूचना

10 मि
  1. 1

    मिक्सरच्या बाऊलमध्ये सांबार पुदिना, लसन जिऱ्याची पेस्ट,हिरवी मिरची हे घालून ठेवणे, दही एका बाउल मध्ये काढणे..

  2. 2

    आता दही मिक्सरच्या बाऊलमध्ये घालून घेणे...

  3. 3

    त्यामध्ये काळे मीठ, साधं मीठ आणि साखर हे घालून घेणे.. आता हे मिक्सरमधून चांगले फिरवून घेणे...

  4. 4

    आता यामध्ये तीन कप पाणी घालून चांगलं एक सारखं फिरवून घेणे... आणि फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवून देणे., आता छान पुदिन्याचा ताक रेडी आहे,, छान जेवताना थंड थंड सर्व्ह करावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Sonal Isal Kolhe
Sonal Isal Kolhe @cook_22605698
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes