नकाब-ए-बिर्याणी (nakaab e biryani recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

#cooksnap
रमजान ईदच्या निमित्ताने बनवलेले स्पेशल असे पदार्थ नकाब ए बिर्याणी.
साधी बिर्याणी तर आपण नेहमीच खातो.
मग या ईदच्या निमित्ताने केलेली स्पेशल अशी बिर्याणी.
सविता जगताप ताई यांना इन्स्पायर होऊन बनवलेली बिर्याणी विथ लिटिल ट्विस्ट.
चला तर बनवूया ईद स्पेशल बिर्याणी.

नकाब-ए-बिर्याणी (nakaab e biryani recipe in marathi)

#cooksnap
रमजान ईदच्या निमित्ताने बनवलेले स्पेशल असे पदार्थ नकाब ए बिर्याणी.
साधी बिर्याणी तर आपण नेहमीच खातो.
मग या ईदच्या निमित्ताने केलेली स्पेशल अशी बिर्याणी.
सविता जगताप ताई यांना इन्स्पायर होऊन बनवलेली बिर्याणी विथ लिटिल ट्विस्ट.
चला तर बनवूया ईद स्पेशल बिर्याणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. चिकन साठी साहित्य
  2. 1 किलोचिकन
  3. २५० ग्राम दही
  4. 2 टेबल स्पूनअद्रक लसूण पेस्ट
  5. 1 टेबल्स्पूनबिर्याणी मसाला
  6. 1टिस्पून तिखट
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1मोठ्या लिंबाचा रस
  9. 1 टेबल स्पूनकोथिंबीर चिरलेली
  10. 1 टेबल स्पूनपुदिन्याचे पाने
  11. 1 टेबल स्पूनतूप
  12. राईस बनवण्यासाठी साहित्य
  13. ५०० ग्राम बासमती तांदूळ
  14. 1 टीस्पूनखडा मसाला
  15. 1 टीस्पूनमीठ
  16. 1 टीस्पूनतेल
  17. 1 लिटरपाणी
  18. नकाब बनवण्यासाठी साहित्य
  19. 1 कपमैदा
  20. 1 टीस्पूनमीठ
  21. 1 टीस्पूनतेल
  22. गार्निशिंगसाठी साहित्य
  23. लाल खाण्याचा रंग
  24. पिवळा खाण्याचा रंग
  25. बारीक चिरून तळलेला कांदा
  26. कोथिंबीर
  27. पुदिन्याचे पाने
  28. केवडा पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वप्रथम चिकन घ्यावे.
    त्यात दही, अद्रक लसूण पेस्ट, तिखट, हळद, बिर्याणी मसाला आणि तूप ॲड करावे.
    मीठ टाकून चिकनला हे सर्व साहित्य छान चोपडून घ्यावे.
    एक तास मॅरीनेशन करायला फ्रीजमध्ये ठेवावे.
    मॅरीनेशन झाल्यानंतर त्याला डायरेक्ट एका कढई मध्ये शिजू द्यावे.
    या चिकन मध्ये पाणी किंवा दुसरे साहित्य काहीच ऍड करू नये.
    चिकन अर्धे शिजू द्यावे आणि बाजूला ठेवावे.

  2. 2

    दुसरीकडे एका भांड्यात बासमती तांदूळ घ्यावे.
    त्यात पाणी खडा मसाला मीठ आणि तेल ऍड करावे.
    हे तांदूळ अर्धे शिजू द्यावे.
    अर्धे शिजल्यानंतर त्यातले पूर्ण पाणी काढून टाकावे.
    आणि भात एका मोकळ्या ताटावर पसरून ठेवावे.

  3. 3

    एकीकडे कांदा बारीक लांब चिरून त्याला कुरकुरीत तळून घ्यावे.

  4. 4

    आता बिर्याणीचे सर्व साहित्य रेडी आहे.
    एक मोठे भांडे घ्यावे.
    त्यात आधी राईस टाकावा.
    त्यावर चिकन, तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिन्याचे पाने टाकावे.
    परत सेम प्रोसेस रिपीट करत परत भात आणि चिकनचे लेअर बनवत रहावी.

  5. 5

    सर्वात वरती तळलेला कांदा पुदिन्याची पाने कोथिंबीर टाकावे.
    वरून एक टीस्पून केवढा पाणी ॲड करावे.
    केवडा पाणी पूर्ण पोर्शन ला कव्हर झाले पाहिजे.
    आवडीनुसार लाल रंग आणि पिवळा रंग ऍड करावे.
    या लेअर केलेल्या बिर्याणीला झाकून स्टीमींग द्यावे.
    दहा मिनिटे शिजू द्यावे.
    आपली बिर्याणी रेडी आहे.

  6. 6

    नकात बनवण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात मैदा मीठ आणि तेल घ्यावे.
    थोडे पाणी ऍड करून छान मळून घ्यावे.
    या मैद्याच्या गोळ्याची मोठी पोळी लाटावी.

  7. 7

    ही पोळी एका कढईमध्ये पसरवून ठेवावी.
    त्यात बनलेली बिर्याणी अॅड करावी.
    या बिर्याणीला पोळी ने पूर्णपणे पॅक करावे.
    ही कढई ही प्रोसेस झाल्यानंतर गॅस वर हे ठेवावी.

  8. 8

    हे पोळीचे पॅकेट दोन्ही साईड ने शेकून घ्यावे.
    सर्व करताना तडका डाळ सोबत सर्व करावे.
    आपली ईद स्पेशल नकाब-ए-बिर्याणी रेडी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

Similar Recipes