भगरिचे अनारसे (उपवास स्पेशल)(bhagariche aanarase recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

ही माझी पन्नासावी रेसिपी.. आज आजी चा बटवा परत एकदा उघडला काय करावे जे जरा हट्के आणी नाविन असेल अरेच्या म्हटले उद्या वड पूर्णिमा..उपास..चला तर ही माझी अवार्ड विन्नींग रेसिपी आहे.. माझ्या सासरी आणी माहेरी फ़ेमस आहे.. चला तर मग घ्या करायला माझी ही स्पेशल रेसिपी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपभगर
  2. 1 कपपिठी साखर
  3. 4 टेबलस्पूनखसखस
  4. 1/2पिकलेल केळ
  5. 200 ग्रॅमतेल

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम भगर रात्रभर बूडेल इतक्या पाण्यात भिजवा सकाळी निथळून वळवून घ्या (थोडी ओलसर हवी ताण्दुळ अनारसा करतो तसा)आणी मिक्सर मधून बारिक दळुन घ्या. न चालताच घ्या. भगर पिठी व पिठी साखर सम प्रमाणात (टीप. साखर जरा एक टीस्पून कमी घ्या) घेउन त्याची उन्डी करुन ठेवा.

  2. 2

    उन्डी एक दोन तास मुरली की एका बाउल मधे मोकळी करुन घेऊन त्यात थोडे थोडे करत केळ घालुन भिजवुन गोळा तैय्यार करुन घ्या.तुम्ही दुध किंवा साजुक तुप घालुन पण मळू शकता(केळा मुळे रंग आणी चव खूप छान लागते). इथे पण एक दोन तास मुरु द्या नंतर लिंबा एवढे गोळे तैय्यार करुन घ्या

  3. 3

    ते लिंबा एव्हडे गोळे एक एक करुन खसखसशी वर छान छोट्या गोल आकारत थापून घ्या व कढईत तेल आधी हाई गैस वर तापून घ्या व जेव्हा अनारसा सोडायचा असेल तेव्हा स्लो गैस करावा.अनारसा हलक्या हातानी कढईत सोडा.

  4. 4

    तेलात अनारसा सोडल्या वर वरुन झार्यानी तेल अनर्स्या वर टाकत रहा.हलका बदामी होतांना दीसला की काढुन फोटोत दाखवल्या प्रमाणे निथळत ठेवा. व मग एका प्लेट वर काढुन घ्या असे सगळे करुन झाले की गरम गरम सर्व्ह करा किंवा थंड करुन डब्ब्यात भरुन ठेवा. माझ्या कडे तर गरम गरम फस्त होतात.. डब्ब्यात भराय साठी उरतच नाही.. भगरिचे अनारसे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes