चिकन विंदालू (chicken vindaloo recipe in marathi)

Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
virar

# गोवन पोर्तुगीज चिकन😋😋

माणसाला प्रवासाची ओढ अर्वाचीन काळापासून आहे. माणुस जेथे जातो तेथे आपली संस्कृती घेऊन जातो. आपली भाषा, पेहराव यांच्यासोबत आपली खाद्यसंस्कृतीही माणुस आपल्या सोबत नेत असतो. या प्रवासात जगभरातील खाद्यसंस्कृती समृद्ध होत आली आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वी काळीमिरीच्या ओढीने पोर्तुगीज भारतात आले, त्यांच्या खाद्यसंस्कृती सोबत आलेली एक झणझणीत डिश म्हणजे 'चिकन विंदालू'. मुळ शब्द 'विनअॅलो' (वाईन आणि लसूण) याचा अपभ्रंश होऊन 'विंदालू' शब्द बनला.
माझ्या आईचे आजोळ गोव्याचे, तिथेच लहानपणी या विंदालूशी माझीओळख झाली. या रेसिपीमधे वाइन नसली तरीही हे आंबट, तिखट 'चिकन विंदालू' दर्दी खवय्यांना नक्कीच आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

साधारणतः २५-३० मिनिटे (मॅरिनेशन व्यतिरिक्त)
४ माणसांसाठी
  1. ५०० ग्रॅम चिकन
  2. 5-6बेडगी मिरच्या व २ काश्मिरी लाल मिरच्या (विनेगर मधे १५ मिनिटे भिजवून)
  3. 1 टीस्पूनजिरे
  4. 1 टीस्पूनधणे
  5. 5-6काळीमिरी
  6. 2-3दालचिनीच्या काड्या
  7. 1 इंचआल्याचा तुकडा
  8. 4-5लसूण पाकळ्या
  9. 2मध्यम आकाराचे कांदे (बारीक चिरलेला)
  10. चवीनुसारमीठ
  11. २-3 टेबलस्पून तेल

कुकिंग सूचना

साधारणतः २५-३० मिनिटे (मॅरिनेशन व्यतिरिक्त)
  1. 1

    प्रथम चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. आता विनेगर मध्ये भिजवलेली मिरची, जिरे, धणे,काळीमिरी,दालचिनी, आले व लसूण मिक्सर मध्ये बारीक वाटून घ्यावे. (गरज पडल्यास त्यात मिरची भिजवलेले थोडे विनेगर घालावे म्हणजे एकदम fine paste होते.)

  2. 2

    आता वाटलेले मिश्रण चिकनला व्यवस्थित लावून ते साधारणपणे अर्धा ते एक तास marinate करून घ्यावे. आता एका pan मध्ये तेल घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा चांगला गुलाबीसर होईपर्यंत परतवून घ्यावा. आता त्यात marinated चिकन घालून व्यवस्थित एकत्रित करून घ्यावे.

  3. 3

    त्यात थोडे पाणी अथवा चिकन स्टॉक घालावा. चवीनुसार मीठ घालावे. झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावे. (अंदाजे २५ - ३० मिनिटे लागतात). कोथिंबीर बारीक चिरून घालावी. (जास्त तिखट झाल्यास त्यात १/२ वाटी दही घालून एक उकळी काढावी.) आणि गरमागरम serve करावे. हे चपातीसोबत किंवा भातासोबतही मस्त लागते. सोबतीला कांदा आणि लिंबू तर हवाच... 😋😋. गार्निशिंग साठी मि थोडे दही वापरले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ashwini Vaibhav Raut
Ashwini Vaibhav Raut @ashwinivraut_81284
रोजी
virar

Similar Recipes