मलई कोफ्ते (malai kofta recipe in marathi)

Manisha Athare
Manisha Athare @cook_24416620

#कोफ्ते
कोफ्ते हा प्रकार ऐकून होते पन आज तो करून पाहिला. ते फक्त कुकपॅडच्या थीम मुळे. पहिल्यांदा करून सुद्धा खुपच मस्त झाले होते कोफ्ते. सर्वांना आवडले.

मलई कोफ्ते (malai kofta recipe in marathi)

#कोफ्ते
कोफ्ते हा प्रकार ऐकून होते पन आज तो करून पाहिला. ते फक्त कुकपॅडच्या थीम मुळे. पहिल्यांदा करून सुद्धा खुपच मस्त झाले होते कोफ्ते. सर्वांना आवडले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मिनिटे
4-5 व्यक्ती साठी
  1. 125 ग्रामपनीर
  2. 3-4उकडलेले बटाटे
  3. 2-3 टीस्पूनमैदा
  4. 15-20काजू
  5. 2कांदे
  6. 2टोमॅटो
  7. 1 टीस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनलाल तिखट
  9. 1 टीस्पूनलसूण आल्याची पेस्ट
  10. चवीनुसारमीठ
  11. 1 टेबलस्पूनतेल
  12. 3-4 टीस्पूनफ्रेश क्रीम

कुकिंग सूचना

30-35 मिनिटे
  1. 1

    प्रथम पनीर किसून घ्या. नंतर उकडलेले बटाटे व पनीर मॅश करुन त्यात 2-3 हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे थोडे मीठ घालून लागेल तसा मैदा घालून चांगले मिक्स करून घ्या. व नंतर त्याचे लहान लहान गोळे करून घ्या. काजूचे तुकडे करून घ्या. व या गोळ्या मध्ये स्टफ करून घ्या. मंद आचेवर तळून घ्या.

  2. 2

    ग्रेव्ही साठी कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घ्या. कढईत तेल गरम करुन त्यात खडे मसाले घालून घ्या. आता चिरलेले कांदा आणि टोमॅटो चांगले मिक्स करून घ्या. व त्यात लसूण आल्याची पेस्ट टाकून पुन्हा चांगले परतून घ्या. ग्रेव्ही ला घट्ट पणा येण्यासाठी काजू घाला. व पेस्ट करुन घ्या.

  3. 3

    कढई मध्ये तेल घालून पेस्ट केलेले मिश्रण घालून चांगले मिक्स करून घ्या त्या वेळी लाल तिखट गरम मसाला मीठ व गरम मसाला घालून परतून घ्या. व आवश्यक तेवढे पाणी घाला. व ग्रेव्ही ला दाटसर पणा येईपर्यंत शिजवून घ्या. व नंतर डिशमध्ये कोफ्ते ठेवून त्यावर तयार ग्रेव्ही टाकून वरून फ्रेश क्रीम घालून सर्व्ह करा गरमागरम मलई कोफ्ते. हवे असल्यास ग्रेव्ही मध्ये ही क्रीम घालू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Manisha Athare
Manisha Athare @cook_24416620
रोजी

टिप्पण्या

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मनीषा #कोफ्ते असं रेसिपीची गोष्ट लिहिलं असतं तिथे type करा. शीर्षक मध्ये फक्त रेसिपीचे नाव लिहा

Similar Recipes